IND vs ENG, 3rd Test: तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी का बांधली दंडाला काळी फित? BCCI दिले स्पष्टीकरण

Team India wearing black arm bands: भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध राजकोटला चालू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दंडाला काळी फित बांधून मैदानात उतरले होते.
Team India Wearing Black Arm Bands
Team India Wearing Black Arm BandsPTI

Why Team India wearing black arm bands during 3rd Test Against England at Rajkot?

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे.

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी (17 फेब्रुवारी) भारतीय संघ दंडाला काळी फित बांधून उतरला. यामागील कारण बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार 'माजी कर्णधार आणि भारताचे सर्वात वयस्कर कसोटीपटू दत्ताजीराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ दंडाला काळी फित बांधली आहे. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.'

Team India Wearing Black Arm Bands
Dattajirao Gaekwad: भारताच्या सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचे निधन, BCCI नेही व्यक्त केला शोक

माजी क्रिकेटपटू दत्ताजीराव कृष्णाराव गायकवाड यांचे मंगळवारी (13 फेब्रुवारी) वयाच्या 95 व्या वर्षी बडोदामध्ये निधन झाले. ते भारताचे सर्वाधित काळ आयुष्य जगलेले कसोटी क्रिकेटपटू होते.

दत्ताजीराव गायकवाड यांनी 1952 ते 1961 दरम्यान भारताकडून 11 कसोटी सामने खेळले. त्यांनी 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तसेच ते 1947 ते 1961 दरम्यान बडोद्यासाठी क्रिकेट खेळले. त्यांनी बडोदयासाठी 47.56 च्या सरासरीने 14 शतकासह 3139 धावा केल्या आहेत.

त्यांनी 1959-60 च्या हंगामात महाराष्ट्र विरुद्ध त्यांची सर्वोच्च 249 धावांची खेळी केली होती. त्यांच्या नेतृत्वात बडोद्याने 1957-58 हंगामात रणजी ट्रॉफीचे विजेतेपदही जिंकले होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा अंशुमन गायकवाड व नातू शत्रुंजय गायकवाड यांनीही क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवली.

Team India Wearing Black Arm Bands
IND vs ENG: टीम इंडियाला धक्का! आर अश्विनची तिसऱ्या कसोटीतून अचानक माघार, BCCI ने सांगितलं कारण

तिसऱ्या कसोटीत फलंदाजांचे वर्चस्व

तिसऱ्या कसोटीत भारताने पहिल्या डावात 130.5 षटकात सर्वबाद 445 धावा केल्या आहेत. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 131 धावा केल्या, तर रविंद्र जडेजाने 112 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सर्फराज खान याने 62 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत इंग्लंडने 35 षटकात 2 बाद 207 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून दुसऱ्या दिवसाखेर बेन डकेट 133 धावांवर नाबाद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com