बंगळुरु कसोटीत टीम इंडियाने (Team India) तिसऱ्या दिवशीच श्रीलंकेला (India v Sri Lanka, 2nd Test) गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारताने दिलेल्या 447 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ 208 धावांत गारद झाला. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) 3 आणि अश्विनने 4 बळी घेतले. अक्षर पटेलला (Akshar Patel) 2 आणि जडेजाला 1 बळी मिळवता आला. भारताने मोहाली कसोटी 222 धावांनी जिंकली. अशा प्रकारे श्रीलंकेचा (Sri Lanka) कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-0 असा पराभव केला. या विजयासह भारताचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 12 गुण झाले आहेत. (Team India swept Sri Lanka in the Test series after 28 years)
दरम्यान, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) बंगळुरु कसोटीत भारताच्या विजयाचा हिरो ठरला, ज्याने दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. ऋषभ पंतला (Rishabh Pant) मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. 60 पेक्षा जास्त सरासरीने धावा करण्यासोबतच त्याने विकेटमागे 8 विकेट्सही घेतल्या. 28 वर्षांनंतर भारताने श्रीलंकेचा कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केला. भारताच्या मालिका विजयाची काय कारणे आहेत ते जाणून घेऊया...
सर्वोत्तम गोलंदाजी
भारताच्या विजयाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची उत्कृष्ट गोलंदाजी. जसप्रीत बुमराह, आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीच्या उत्कृष्ट गोलंदाजीने श्रीलंकेचा धुव्वा उडवला. बुमराह आणि जडेजाने 10-10 विकेट घेतल्या.
पंत-अय्यरने ताकद दाखवली
श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी या मालिकेत शानदार कामगिरी केली. मोहालीनंतर बंगळुरुच्या खेळपट्टीवरही दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली. अय्यरने 62 च्या सरासरीने 186 तर पंतने 61.66 च्या सरासरीने 185 धावा केल्या. दोघांनी 2-2 अर्धशतके ठोकली.
जडेजा झाला 'रॉकस्टार'
रवींद्र जडेजाने एकट्याने श्रीलंकंन संघाचा चांगलाच समाचार घेतला. जडेजाने मोहाली कसोटी एकट्याने जिंकली. पहिल्यांदा त्याने नाबाद 175 धावांची खेळी उभारली. आणि त्यानंतर त्याने मालिकेत 10 विकेट्सही घेतल्या. या मालिकेत जडेजाची फलंदाजीची सरासरी 100 पेक्षा जास्त होती.
श्रीलंकेचे जखमी खेळाडू
मालिकेदरम्यान श्रीलंकेचे महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले. विशेष म्हणजे पूर्ण ताकदीने मैदानात ते उतरु शकले नाही. श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज निशांक दुखापतीमुळे दुसरी कसोटी खेळू शकला नाही. दुष्मंता चमीरा संपूर्ण मालिकेत खेळू शकला नाही. कुसल मेंडिसही एकच कसोटी खेळला.
श्रीलंकेची सरासरी कामगिरी
कर्णधार दिमुथ करुणारत्ने सोडला तर श्रीलंकेच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. या मालिकेत फक्त करुणारत्नेच 100 हून अधिक धावा करु शकला. गोलंदाजीतही श्रीलंकेची कामगिरी सुमारचं राहीली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.