IND vs SL: कपिल देव अन् मुलतानच्या सुलतानला मागे टाकत पंत बनला नंबर-1

दुसऱ्या डावात पंतने (Rishabh Pant) 31 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावा केल्या.
Rishabh Pant
Rishabh PantDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीलंकेविरुद्धच्या बंगळुरु कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये ऋषभ पंत शानदार फॉर्ममध्ये दिसला. दोन्ही डावात पंतने शानदार फलंदाजी केली. पहिल्या डावात पंतचे (Rishabh Pant) अर्धशतक हुकले होते, परंतु दुसऱ्या डावात मात्र त्याने आपले लक्ष पूर्ण केले. त्याच वेळी, ऋषभ पंतने विक्रम करत मोठ्या दिग्गजांना मागे सोडले. (IND vs SL Second Test Rishabh Pant break Kapil Dev and Virender Sehwags record)

दरम्यान, पंतने पहिल्या डावात अंबुलदेनियाच्या गोलंदाजीवर 26 चेंडूंत 7 चौकारांसह 39 धावा केल्या त्यामुळे पहिल्या डावात श्रीलंकेविरुध्द (Sri Lanka) भारताला आघाडी मिळवता आली. त्यानंतर दुसऱ्या डावात पंतने शानदार फलंदाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचा घेतला.

Rishabh Pant
Ind vs SL 2nd Test: श्रीलंकेचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर गारद, लाजिरवाणा विक्रम

तसेच, दुसऱ्या डावात पंतने 31 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावा केल्या. विशेष म्हणजे या खेळीमुळे त्याने जे करुन दाखवले ते त्याआधी भारतीय क्रिकेटमध्ये कपिल देवही करु शकले नाही, ना वीरेंद्र सेहवाग किंवा या दोघांशिवाय दुसरा कोणताही फलंदाज. ऋषभ पंत भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. पंतच्या आधी कपिल देवने (Kapil Dev) 1982 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कराचीमध्ये, शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) गेल्या वर्षी ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध (England) 31 चेंडूत आणि 2008 मध्ये चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) हा पराक्रम केला होता.

Rishabh Pant
IND vs SL: रोहित शर्माचा पुल शॉट होणार 'बंद'?

शिवाय, पंतने या दिग्गजांना मात देत रविवारी श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच वेळी, शाहिद आफ्रिदी या रेकॉर्डमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने 2005 मध्ये बंगळुरुमध्ये भारताविरुद्ध 26 चेंडूत अर्धशतक केले होते, तर इऑन बॉथमने 28 चेंडूत हीच खेळी केली होती. परंतु, पंतने बरोबरी साधली असून भारतीय भूमीवर एकूण फलंदाजांमध्ये संयुक्तरित्या 2 क्रमांक मिळवला आहे. त्याच्यापाठोपाठ अर्जुन रणतुंगाचा क्रमांक लागतो, ज्याने 1996 मध्ये भारताविरुद्ध 31 चेंडूत सर्वात जलद अर्धशतक झळकावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com