IND vs SL: रोहित शर्माचा पुल शॉट होणार 'बंद'?

जगातील कोणता क्रिकेटर अफलातून पुल शॉट खेळतो? या प्रश्नाचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma).
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

जगातील कोणता क्रिकेटर अफलातून पुल शॉट खेळतो? या प्रश्नाचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे रोहित शर्मा. मात्र रोहित शर्माचा हाच शॉट त्याच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. रोहित (Rohit Sharma) गेल्या अनेक डावांमध्ये एकच शॉट खेळत असताना बाद झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीतही असंच काहीसं घडलं. 29 धावांवर खेळत असताना वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराच्या शॉर्ट बॉलवर त्याने पुल शॉट मारला, परंतु तो चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. रोहितने त्याची चांगली सुरुवात खराब केली. आता हेच पाहून टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी रोहीतला सल्ला दिला आहे. रोहितने त्याच्या पुल शॉटवर 'बंदी' घालावी, असं गावस्करांनी म्हटले आहे. (Sunil Gavaskar Has Said That Rohit Sharma Should Put A Ban On His Pull Shot)

वास्तविक, सुनील गावस्कर यांनी रोहितला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी हा शॉट खेळू नये, असा सल्ला दिला होता. गावस्कर यांच्या मते, रोहित शर्माला या शॉटवर नियंत्रण ठेवावे लागेल. रोहित क्रिझवर सेट झाल्यावर अचानक पुल शॉट खेळून विकेट गमावतो असे अनेकवेळा पाहायला मिळाले आहे.

Rohit Sharma
IND vs SL: जसप्रीत बुमराह म्हणाला...'डे-नाईट कसोटी सामन्यांसाठी निश्चित सूत्र नाही'

गावस्कर म्हणाले - रोहितने पुल शॉटवर नियंत्रण ठेवावे

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, 'रोहितला याचा विचार करावा लागेल. तुम्ही असा युक्तिवाद करु शकता की, हा एक धाव देणारा शॉट आहे, परंतु हा एकमेव शॉट नाही जो धावा देतो. त्याच्याकडे अजून बरेच शॉट्स आहेत. आता काही वेगवान गोलंदाज त्याच्याविरुद्ध जोखीम पत्करतात.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com