2023 Special Olympics Summer Games : जिगरबाज तानियाने जिंकले रौप्य

पावसाळी वातावरणात आव्हानात्मक रोलर स्केटिंग
Taniya Usgaonkar
Taniya UsgaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

Taniya Usgaonkar : पावसाळी वातावरण स्केटिंग करणे कठीणच ठरते, मात्र गोव्याच्या पंधरा वर्षीय तानिया उसगावकर हिने प्रचंड जिद्दीच्या बळावर आव्हान पेलत जर्मनीतील बर्लिन येथे सुरू असलेल्या स्पेशल ऑलिंपिक्स जागतिक उन्हाळी स्पर्धेत रोलर स्केटिंगमधील वैयक्तिक दुसरे पदक जिंकले. यावेळी ती 30 मीटर स्लॅलॉम प्रकारात रौप्यपदकाची मानकरी ठरली.

बर्लिनमधील स्पर्धेत तानियाने अगोदर 30 मीटर स्ट्रेट लाईन रोलर-स्केटिंगमध्ये ब्राँझपदक पटकावले होते. डिचोलीतील केशव सेवा साधना केंद्रात शिकणाऱ्या तानिया हिचा स्पर्धेत दोन पदके जिंकण्याचा संकल्प होता. यावेळस तिला सुवर्णपदक थोडक्यात हुकले.

महंमद निसारनंतर तिला दुसरा क्रमांक मिळाला, मात्र रुमानियाच्या कोरिना कँपेनू हिला मागे सारून रौप्यपदकाचा मान मिळविला.

Taniya Usgaonkar
Rumdamol Panchayat : रुमडामळात पोलिसांची करडी नजर; नमाजावेळी पोलिस बंदोबस्त

स्पेशल ऑलिंपिक्स भारतचे राष्ट्रीय क्रीडा संचालक व्हिक्टर वाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्लिनला शुक्रवारी जोरदार पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे बहुतेक आऊटडोअर शर्यती थांबवाव्या लागल्या. मात्र पावसाळी वातावरण असूनही तानियाने स्पर्धेत दुसरे पदक जिंकण्याचा संकल्प तडीस नेला.

देशासाठी पदके जिंकण्याचे ध्येय साध्य

‘‘सहभागी झालेल्या दोन्ही शर्यतीत देशासाठी आणि स्वतःसाठी पदके जिंकण्याचे ध्येय मी बाळगले होते. माझी व कुटुंबीयांची ही स्वप्नपूर्ती आहे. या स्पर्धेत पदके जिंकण्यासाठी मागील काही महिने भरपूर मेहनत घेतली आणि आज त्याचे गोड फळ मिळाले.

पदकप्राप्तीचे श्रेय मी स्पेशल ऑलिंपिक्स भारत, स्पेशल ऑलिंपिक्स गोवा, तसेच माझे प्रशिक्षक आणि या स्वप्नवत वाटचालीत ज्यांनी मला पाठबळ दिले त्या सर्वांना देते,’’ अशी प्रतिक्रिया अत्यानंदित झालेल्या तानियाने बर्लिन येथून दिली.

Taniya Usgaonkar
Lionel Messi Birthday: स्वप्नवत कारकिर्द घडवणाऱ्या मेस्सीच्या आयुष्यातील 5 सुवर्णक्षण एकदा पाहाच

गोव्याच्या खेळाडूंना आठ पदके

भारतीय संघात निवडण्यात आलेल्या गोव्याच्या खेळाडूंनी बर्लिनमध्ये एकूण आठ पदके जिंकली आहेत. गीतांजली नागवेकर हिने ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून भारताचे पदकतक्त्यातील खाते उघडले.

त्यानंतर पॉवरलिफ्टिर सिया सरोदे हिने दोन सुवर्ण (डेड लिफ्ट व स्क्वॅट), एक रौप्य (कंबाईंड) व एक ब्राँझ (बेंच प्रेस) अशी एकूण चार पदके जिंकली. रोलर स्केटर तानिया उसगावकरला रौप्य व ब्राँझपदक मिळाले, तर गेबन मुल्ला हिने मिनी भालाफेकीत लेव्हल सी प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली.

आणखी पदकांची अपेक्षा

गोव्याच्या व्हेन्सन पेस, अमन नदाफ, ज्योएल रॉड्रिग्ज व फ्रान्सिस पारिसापोगु यांचा समावेश असलेल्या भारताच्या फुटबॉल संघाने अंतिम फेरी गाठली आहे. सुवर्णपदकासाठी त्यांची लढत सेंट ल्युसिया संघाविरुद्ध होईल.

वैयक्तिक गटात ज्युदोत गोव्याच्या अस्लम गंजानावर याला सुवर्णपदकाची संधी असेल. गीतांजली नागवेकर स्पर्धेतील दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकू शकते. तिने सहकारी असीफ मलानूरसह ४०० मीटर शर्यतीची अंतिम फेरी गाठली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com