Syed Mushtaq Ali Trophy 2023: उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या बळावर गोव्याने मंगळवारी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. क गट लढतीत त्यांनी दुबळ्या मणिपूरला सहा विकेट आणि 22 चेंडू राखून सहजपणे नमविले.
सामना झारखंडमधील रांची येथे झाला. गोव्याने सोमवारी आंध्रला 31 धावांनी नमविले होते. मंगळवारी त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
गोव्याच्या प्रभावी गोलंदाजीसमोर मणिपूरला 9 बाद 122 धावाच करता आल्या. त्यांच्या जॉन्सन सिंग याने एकहाती लढत देताना अर्धशतक नोंदविले. नंतर गोव्याने 16.2 षटकांत 4 विकेट गमावून 123 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक ः
मणिपूर ः 20 षटकांत 9 बाद 122 (नीतेश सेदाई 22, जॉन्सन सिंग 50, अर्जुन तेंडुलकर 3-0-27-2, शुभम तारी 2-0-14-2, दर्शन मिसाळ 4-0-15-1, लक्षय गर्ग 4-0-34-1, विकास सिंग 3-0-11-1, मोहित रेडकर 4-0-21-1)
पराभूत वि. गोवा ः 16.2 षटकांत 4 बाद 123 (ईशान गडेकर 34, राहुल त्रिपाठी 2, के. व्ही. सिद्धार्थ 39, दर्शन मिसाळ 16, सुयश प्रभुदेसाई नाबाद 25, तुनीष सावकार नाबाद 2).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.