World Cup 2023: पाकिस्तान संघाला मोठा झटका, अनेक स्टार क्रिकेटर्स 'या' आजाराने त्रस्त!

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 दरम्यान पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे.
Pakistan Cricket Team
Pakistan Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 दरम्यान पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान संघातील अनेक स्टार क्रिकेटर्स व्हायरल फिव्हरला बळी पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान संघाच्या चार ते पाच खेळाडूंना खूप ताप आणि व्हायरल संसर्ग झाला आहे.

दरम्यान, शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानला भारताविरुद्ध 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

तेव्हापासून पाकिस्तान संघाच्या क्रिकेटपटूंना सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. यातच आता, पाकिस्तानला आपला पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 20 ऑक्टोबर रोजी बंगळुरुमध्ये खेळायचा आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला हा मोठा धक्का बसला आहे.

Pakistan Cricket Team
World Cup 2023: गणपती बाप्पा मोरया... ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल!

दुसरीकडे, 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाची तयारी विस्कळीत झाली आहे, कारण अनेक प्रमुख खेळाडू व्हायरल फिव्हरला बळी पडले आहेत, त्यामुळे या स्पर्धेत पाकिस्तान संघाला आणखी धक्का बसला आहे.

चिंता देखील निर्माण झाली आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी 'सामा टीव्ही'च्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी व्हायरल बॅक्टेरियाच्या संसर्गाला बळी पडला आहे. शाहीन शाह आफ्रिदीने प्रकृती सुधारण्यासाठी अँटीबायोटिक ड्रिप आणि वैद्यकीय मदत घेतली आहे.

अब्दुल्ला शफीकला खूप ताप आहे

पाकिस्तानी संघाचा सलामीवीर अब्दुल्ला शफीक यालाही खूप ताप आहे. डॉक्टर सध्या अब्दुल्ला शफीकच्या प्रकृतीची तपासणी करत आहेत. याशिवाय, पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज जमान खान देखील व्हायरल संसर्गाने बाधित खेळाडूंच्या यादीत सामील झाला, ज्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

Pakistan Cricket Team
World Cup 2023: स्टीव्ह स्मिथच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड, भारतीय भूमीवर वर्षात चौथ्यांदा शून्यावर आऊट!

उसामा मीरला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे

लेग स्पिनर उसामा मीर हा देखील व्हायरल संसर्गामुळे प्रभावित झालेल्या खेळाडूंमध्ये आहे, ज्यांनी पाच दिवस या आजाराशी झुंज दिली आणि खबरदारी म्हणून त्यांना अलग ठेवण्यात आले. कोविड-19 आणि डेंग्यू व्यतिरिक्त मीरवर केलेल्या सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान, मीरच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तो पुन्हा एकदा सिलेक्शनसाठी उपलब्ध आहे. या आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान संघाच्या मीडिया मॅनेजरने खुलासा केला आहे की, क्रिकेटपटूंमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत.

पाकिस्तान (Pakistan) संघाचे आजचे सराव सत्र त्यांच्या खेळाडूंच्या आरोग्याच्या समस्यांमुळे रद्द करण्यात आले. या धक्क्याचा पाकिस्तानच्या विश्वचषक मोहिमेवर काय परिणाम होतो हे पाहणे बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com