Musical Ceremony ahead Of India vs Pakistan ICC ODI Cricket World Cup 2023 match:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान संघात सामना रंगणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर म्हणजेच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी एक संगीत सोहळा पार पडणार आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी केवळ कॅप्टन्स डे आयोजिक करण्यात आला होता. पण उद्घाटन सोहळा झाला नव्हता. पण असे असले तरी भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी खास सोहळा बीसीसीआयकडून आयोजित करण्यात आला असून याबद्दल घोषणाही करण्यात आली आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियमची 1 लाखाहून अधिक आसन क्षमता असल्याने या सामन्यासाठी विक्रमी प्रेक्षकवर्ग दिसण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवरच दुपारी 12.30 वाजता या संगीत सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी 1.30 वाजता नाणेफेक होणार आहे.
हा सोहळा चाहत्यांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर दिसणार आहे, तसेच हॉटस्टार + डिज्नी ऍप आणि वेबसाईटवरही लाईव्ह पाहाता येणार आहे.
भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी होणाऱ्या संगीत सोहळ्यात अरजित सिंग, सुखविंदर सिंग, शंकर महादेवन हे परफॉर्म करणार असल्याचे बीसीसीआयने घोषित केले आहे. याबरोबरच रणवीर सिंग आणि तमन्ना भाटीया यांचेही परफॉर्मन्स होणार असल्याचे म्हटले जात आहे.
याशिवाय बीसीसीआयकडून यंदा अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि सचिन तेंडुलकर यांना गोल्डन तिकीट देण्यात आले आहे, त्यामुळे हे सेलिब्रेटीही या सोहळ्यासाठी सहभागी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी शनिवारी होणारा सामना यंदाच्या वर्ल्डकपमधील प्रत्येकी तिसरा साखळी सामना आहे. दोन्ही संघांनी पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत, त्यामुळे हे दोन्ही संघ आपली विजय लय राखण्यासाठी शनिवारी प्रयत्नशील असतील.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्लाह शफिक, मोहम्मद रिझवान, सौद शकिल, इफ्तिखर अहमद, सलमान अली आघा, मोहम्मद नवाझ, उस्मान मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहिन आफ्रिदी, मोहम्मद वासिम.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.