Suryakumar Yadav: बांगलादेश दौऱ्यावर न गेलेला सूर्यकुमार आता खेळणार रहाणेच्या नेतृत्वात?

सूर्यकुमार यादवला बांगलादेश दौऱ्यातून विश्रांती देण्यात आलेली, पण आता तो लवकरच मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDank Gmantak
Published on
Updated on

Suryakumar Yadav: भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव भारतीय संघासह बांगलादेश दौऱ्यावर गेलेला नाही. त्याला या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आलेली. पण आता तो आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसू शकतो.

रिपोर्ट्सनुसार सूर्यकुमारने मुंबई क्रिकेट असोसिएशनला तो मुंबईच्या दुसऱ्या रणजी सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. मुंबईला दुसरा रणजी सामना 20 डिसेंबरपासून हैदराबाद विरुद्ध खेळायचा आहे.

दरम्यान, मुंबईने 13 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेसाठी संघाची निवड केली आहे. पण यात दुसऱ्या सामन्यासाठी सूर्यकुमारचा (Suryakumar Yadav) समावेश केला जाऊ शकतो.

मुंबईने (Mumbai) रणजी ट्रॉफीसाठी (Ranji Trophy) अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाची धूरा सोपवली आहे. तसेच संघात यशस्वी जयस्वाल, पृथ्वी शॉ, सरफराज खान यांसारख्या खेळाडूंचाही समावेश आहे.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav: 'जगात केवळ एकच 360 डिग्री प्लेयर', सूर्यकुमार यादवने दिलं उत्तर

तसेच सूर्यकुमार भारताकडून गेल्या महिन्यात संपलेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये खेळला होता. या वर्ल्डकपमध्ये त्याने चांगली कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले होते. पण तो सातत्याने खेळत असल्याने त्याला सध्या चालू असलेल्या बांगलादेश दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे.

सूर्यकुमारने भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये जरी त्याची जागा जवळपास पक्की केलेली असली, तरी त्याला अद्याप कसोटीत पदार्पणाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे कसोटीसाठीही संघात स्थान मिळवायचे असेल, तर आता सूर्यकुमारकडे रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करत स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असेल.

Suryakumar Yadav
ICC Ranking: सूर्यकुमार यादवने केला मोठा करिष्मा, T20 क्रमवारीत घेतली मोठी गगनभरारी

तसेच जर सूर्यकुमारने त्याची चांगली कामगिरी कायम ठेवली, तर त्याला पुढीलवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते.

दरम्यान, सूर्यकुमारने आत्तापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 77 सामने खेळले असून 44.1 च्या सरासरीने 5326 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 14 शतकांचा आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.

रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघ - अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, अरमान जाफर, सरफराज खान, सुवेद पार्कर, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टॅन डायस, सुर्यांश शेडगे, शशांक अतार्डे, मुशीर खान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com