Suryakumar Yadav: T20 क्रमवारीत सूर्याचा बोलबाला, पांड्यालाही लाभ!

Team India: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak
Published on
Updated on

ICC T20 Rankings: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी एक आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या T20 क्रमवारीत सूर्या जगातील नंबर-1 फलंदाज म्हणून कायम आहे. सूर्याने आपले अव्वल फलंदाजांचे स्थान कायम ठेवले आहे. तर अष्टपैलू हार्दिक पांड्या टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत 50 व्या स्थानावर पोहोचला आहे.

सूर्यकुमार यादवसाठी मोठी बातमी आली

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद 111 धावांची खेळी करुन क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतून सूर्यकुमार यादवला 31 रेटिंग गुण मिळाले आहेत. तर 890 रेटिंग गुणांसह तो दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानच्या (Pakistan) मोहम्मद रिझवानपेक्षा 54 रेटिंग गुणांनी पुढे आहे.

Suryakumar Yadav
Team India: रोहित शर्माने टीम इंडियाचे T20 कर्णधारपद का सोडावे? ही 3 सर्वात मोठी कारणे

हार्दिक 50 व्या स्थानावर पोहोचला

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिकने मालिकेतील शेवटच्या सामन्यात नाबाद 30 धावांची खेळी करुन फलंदाजांमध्ये संयुक्त 50 व्या स्थानावर पोहोचला. गोलंदाजांच्या क्रमवारीत अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दोन स्थानांनी प्रगती करत 11 व्या स्थानावर तर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग एका स्थानाची आघाडी घेत 21 व्या स्थानावर पोहोचला आहे.

एकदिवसीय क्रमवारीत कोहली सहाव्या स्थानावर

फिरकीपटू युजवेंद्र चहलने आठ स्थानांनी झेप घेत 40 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली सहाव्या स्थानासह अव्वल भारतीय आहे. कर्णधार रोहित शर्मा आठव्या स्थानावर कायम आहे. तर दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या यादीत 11 व्या स्थानावर आहे.

Suryakumar Yadav
Team India: न्यूझीलंडविरुद्ध या 5 स्फोटक फलंदाजांनी केल्या सर्वाधिक धावा !

स्टीव्ह स्मिथ त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंगवर आहे

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांनी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) 269 धावांच्या अप्रतिम भागीदारीनंतर फलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा केली. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथनेही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सातव्या क्रमांकाची बरोबरी साधली.

Suryakumar Yadav
Team India Viral Video: टीम इंडियाचा स्वॅग, न्यूझीलंडच्या बीचवरील खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल

सातव्या क्रमांकावर अ‍ॅडम झाम्पा

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 106 धावांची खेळी करणारा वॉर्नर पाचव्या स्थानावर पोहोचला आहे, तर त्यात 152 धावा करणारा हेड 12 स्थानांनी प्रगती करत 30 व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत मिचेल स्टार्क चौथ्या स्थानावर तर अ‍ॅडम झाम्पा सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com