IPL 2026: "पैसे घेतात पण खेळत नाहीत!" कांगारू खेळाडूंच्या नखऱ्यांवर सुनील गावस्कर संतापले; दिला कडक इशारा

Sunil Gavaskar on foreign players: आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे, मात्र स्पर्धेपूर्वीच वादाची ठिणगी पडली आहे.
Sunil Gavaskar slams Australian players
Sunil Gavaskar on foreign playersDainik Gomantak
Published on
Updated on

Sunil Gavaskar Statement : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे, मात्र स्पर्धेपूर्वीच वादाची ठिणगी पडली आहे. विशेषतः ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या 'वर्कलोड मॅनेजमेंट' आणि फिटनेसच्या कारणास्तव सुरुवातीच्या सामन्यांतून माघार घेण्याच्या वृत्तीवर भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "अशा खेळाडूंना थेट बाहेरचा रस्ता दाखवा," अशा कठोर शब्दात गावस्करांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

बड्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची दांडी

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाचे स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड हे फिटनेसच्या कारणास्तव आयपीएलचे पहिले तीन सामने खेळणार नाहीत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या गोलंदाजांच्या कामाचा ताण (वर्कलोड) विचारात घेऊन हा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, लिलावाच्या वेळी उपलब्धतेबाबत स्पष्ट माहिती न देता, ऐनवेळी माघार घेण्याच्या या प्रकारामुळे संघांच्या नियोजनावर मोठा परिणाम होत आहे.

Sunil Gavaskar slams Australian players
Goa Theatre: '..अन्यथा नाट्यस्पर्धा फक्त कागदोपत्रीच राहतील'! नाटकांना कमी गर्दी का?

फ्रेंचायझी मालकांना कठोर पाऊले उचलण्याचे आवाहन

सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, खेळाडूंच्या अशा वागण्यामुळे संघाच्या मालकांचे आणि प्रशिक्षकांचे संपूर्ण नियोजन कोलमडून पडते. "जेव्हा खेळाडू लिलावापूर्वी आपल्या अनुपलब्धतेबद्दल माहिती देत नाहीत, तेव्हा ते संघाच्या विजयाच्या प्रयत्नात अडथळा ठरतात. जोपर्यंत संघ मालक कडक भूमिका घेऊन अशा खेळाडूंना संघातून बाहेर काढत नाहीत, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही," असे गावस्कर म्हणाले. केवळ आपल्या मर्जीनुसार संघात येणाऱ्या खेळाडूंमुळे विजेतेपदाची स्वप्ने धूळीस मिळतात, असा इशाराही त्यांनी दिला.

Sunil Gavaskar slams Australian players
Goa Crime: मोरजीत रशियन पर्यटकाचा संशयास्पद मृत्यू; भाड्याच्या खोलीत आढळला मृतदेह, पोलीस तपास सुरू

गावस्कर यांनी पुढे आयपीएलमधील सुखसोयींचा उल्लेख करत खेळाडूंना सुनावले. ते म्हणाले की, "भारतीय संघ मालक खेळाडूंच्या सोयीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. खेळाडूंच्या कुटुंबाचा प्रवास आणि राहण्याचा खर्चही उचलला जातो. हे भारतीय आदरातिथ्य आहे, पण काही परदेशी खेळाडू याला आपला हक्क समजतात आणि त्याचा गैरफायदा घेतात." करोडो रुपये घेणारे हे खेळाडू जेव्हा ऐनवेळी माघार घेतात, तेव्हा तो केवळ आर्थिक फटका नसून चाहत्यांच्या विश्वासालाही तडा असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com