Dhruv Jurel: 'कॅप्टन कूल'च्या रांचीत जुरेलचं अर्धशतक, कुंबळे-गावसकरांना आठवला एमएस धोनी; म्हणाले...

India vs England, Ranchi Test: रांचीत सुरु असेलल्या कसोटीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने इंग्लंडविरुद्ध शानदार अर्धशतक ठोकले. त्याच्या खेळीबद्दल कौतुक करताना कुंबळे आणि गावसकरांना एमएस धोनीची आठवण झाली.
Dhruv Jurel - MS Dhoni
Dhruv Jurel - MS DhoniX/BCCI

Sunil Gavaskar and Anil Kumble praised Dhruv Jurel for playing superb knock in MS Dhoni’s hometown Ranchi

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना रांचीतील जेएससीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने झुंजार अर्धशतकी खेळी करत अनेकांना प्रभावित केले आहे.

विशेष म्हणजे रांची हे भारताचा माजी यष्टीरक्षक आणि कर्णधार एमएस धोनीचे घरचे मैदान आहे. धोनी भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक फलंदाजही आहे. त्यामुळे रांचीत जुरेलने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केलेल्या कामगिरीमुळे अनेकांना धोनीची आठवण झाली आहे.

याबद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि सुनील गावसकर यांनीही भाष्य केले आहे.

Dhruv Jurel - MS Dhoni
IND vs ENG, Video: रांची कसोटीदरम्यान BCCI प्रोडक्शन टीमने दंडाला का बांधली काळी फित? 'हे' आहे कारण

जुरेल फलंदाजी करत असताना गावसकर समालोचना दरम्यान म्हणाले, 'नक्कीच त्याने चांगली फलंदाजी केली आहे. पण त्याचे यष्टीरक्षणही शानदार राहिले. सामन्यातील त्याची जागरुकता दिसून आली, मी असे म्हणेल की आणखी एक एमएस धोनी तयार होत आहे.'

'मला माहित आहे की आणखी एक एमएस धोनी होऊ शकत नाही, पण तुम्हाला त्याची सतर्कता पाहा. एमएस धोनीनेही जेव्हा सुरुवात केली होती, तेव्हा त्याच्याबाबतीतही असेच होते. जुरेलकडेही सामन्याची समज आहे. तोही स्ट्रिट -स्मार्ट क्रिकेटपटू आहे.'

याशिवाय गावसकरांनी असेही म्हटले की त्याचे जरी या सामन्यात शतक हुकले असले, तरी तो भविष्यात अनेक शतके करु शकतो.

जुरेलने या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 161 धावांवर 5 विकेट्स गमावल्यानंतर फलंदाजीला आला होता. तो फलंदाजीला आल्यानंतर सर्फराज खान आणि आर अश्विन यांच्या विकेट्स झटपट गेल्या होत्या.

परंतु, नंतर त्याने कुलदीप यादवबरोबर 8 व्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली, तसेच 9 व्या विकेटसाठी आकाश दीपबरोबर 40 धावांची भागीदारी केली. त्यामुळे त्याने भारताला 300 धावांचा टप्पाही पार करून दिला. पण अखेर टॉम हर्टलीने जुरेलला बाद करत भारताचा पहिला डाव 307 धावांवर संपवला होता. जुरेलने 149 चेंडूत 90 धावांची खेळी केली.

Dhruv Jurel - MS Dhoni
IND vs ENG: कारगिल युद्धात लढलेल्या जवानाचा मुलगा टीम इंडियासाठी ठरला संकटमोचक, जुरेलचे अर्धशतकानंतर खास सेलिब्रेशन

त्याच्या या खेळीबद्दल जिओ सिनेमाशी बोलताना अनिल कुंबळे म्हणाला, 'यापेक्षा आणखी चांगल्या ठिकाणी अशी खेळी होऊ शकली नसती. हे एमएस धोनीचे शहर आहे. तो भाकचाचा सर्वोत्तम यष्टीरक्षक आणि कर्णधार आहे.'

'कोणत्याही यष्टीरक्षक फलंदाजासाठी येथे येणे खास आहे. जुरेल खूप चांगला खेळला. त्याने काही चेंडू चांगले सोडले. त्याला त्याच्या बचावाबाबतही पूर्ण खात्री होती. तो काहीवेळा आक्रमकही होता.त्याला माहित होते की या ठिकाणी कोणत्याप्रकारचे शॉट्स फायदेशीर होते.'

याबरोबरच कुंबळे म्हणाला, '9, 10 आणि 11 व्या क्रमांकाच्या फलंदाजांबरोबर फलंदाजी करणे सोपे नसते, पण त्याने ते खूप चांगले केले. त्याने फक्त चांगली फलंदाजीच केली नाही, तर इंग्लंडची आघाडीही त्यांच्याबरोबर फलंदाजी करताना साधारण 50 धावांनी कमी केली.'

दरम्यान, इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या असल्याने त्यांनी 46 धावांची आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात इंग्लंडती फलंदाजी गडगडली आणि ते 53.5 षटकात 145 धावांवर सर्वबाद झाले. त्यामुळे भारतासमोर इंग्लंडने विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य ठेवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com