दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम वनडेसाठी टीम इंडियामध्ये करण्यात आलेले बदल सामना सुरू होताच रंग दाखवू लागले. दीपक चहरला (Deepak Chahar) नवीन चेंडूने विकेट घेण्याचे कौशल्य अवगत होतेच, पण केपटाऊन येथिल वनडेतही त्याने ते जगाला कौशल्य दाखवून दिले. त्याने सामन्यातील 7वा चेंडू टाकताच, दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर जेनेमन मलानची (Janneman Malan) विकेट्स घेतली.
केपटाऊन (Capetown) येथिल एकदिवसीय सामन्यात दीपक चहरने भारतासाठी नवीन चेंडूने गोलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या षटकात त्याने फक्त धावा रोखल्या तर दुसऱ्या षटकात येताच दक्षिण आफ्रिकेची सुरूवातच खराब केली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार खेळी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर येनेमन मलानचा त्याने विकेट घेतली. घेतलेली विकेट केवळ दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्काच नव्हता तर भारतासाठी मोठी बाब होती, जे भारताला (India) 2019 च्या विश्वचषकानंतर म्हणजेच 3 वर्षांनंतर प्रथमच मिळाले.
चहरने मालनला पंतकरवी कॅच
नवीन चेंडूचा मास्टर दीपक चहरने यनेमान मालनला यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) हाती झेलबाद केले. त्याच्या सहा एकदिवसीय सामन्यातील एकदिवसीय कारकिर्दीतील हा 7 वी विकेट होती. याआधी खेळलेल्या 5 वनडेत त्याने 6 विकेट्स घेतल्या होत्या. दीपक चहर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला वनडे खेळत आहे. याआधी त्याने वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध 2-2 वनडे तर अफगाणिस्तानविरुद्ध 1 सामना खेळला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.