Sumit Nagal: नागलची टॉप-100 टेनिसपटूंमध्ये एन्ट्री, चेन्नई ओपन जिंकत रचला नवा पराक्रम

Sumit Nagal Ranking: भारताचा टेनिसपटू सुमीत नागलने चेन्नई ओपन जिंकत रँकिंगमध्ये टॉप-100 मध्ये प्रवेश केला आहे.
Sumit Nagal
Sumit NagalPTI

Sumit Nagal enter top-100 in World Ranking:

भारताचा टेनिसपटू सुमीत नागलने रविवारी (11 फेब्रुवारी) इतिहास रचला आहे. त्याने रविवारी चेन्नई ओपन स्पर्धा जिंकली. हे त्याचे चँलेंजर लेव्हलचे एकेरीतील पाचवे विजेतेपद आहे.

नागलने रविवारी अंतिम सामन्यात इटलीच्या लुका नार्दीला 6-1,6-4 अशा फरकाने दोन सेटमध्ये पराभूत केले. त्यामुळे आता नागलने जागतिक क्रमवारीत एकेरीमध्ये 98 वा क्रमांक मिळवला आहे.

त्याने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच क्रमवारीत टॉप-100 प्रवेश केला आहे. 2019 नंतर तो पहिल्या 100 मध्ये येणारा पहिलाच भारतीय आहे. तसेच तो जागतिक क्रमवारीत पहिल्या 100 जणांमध्ये स्थान मिळवणारा 10 भारतीय पुरुष टेनिसपटू आहे.

Sumit Nagal
Sumit Nagal: अनेक मैदाने गाजवणाऱ्या टेनिसपटूची जगण्यासाठी धडपड, खात्यात राहिले अवघे 80 हजार

नागल रविवारी मिळवलेल्या विजयानंतर भावूकही झाला होता. तो म्हणाला, 'मी आज खूप भावूक झालो आहे. प्रत्येक टेनिस खेळणाऱ्या खेळाडूचे स्वप्न असते की त्याने कमीतकमी क्रमवारीत टॉप-100 मध्ये यावे. मी आधी म्हटलो तसे आपल्या स्वत:च्या देशात आपल्याच प्रेक्षकांसमोर हा सामना जिंकणे, यापेक्षा अधिक मी काही मागू शकत नाही.'

त्याचबरोबर त्याने सांगितले की याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी त्याच्याकडे शब्द अपूरे असून अश्रूच खूप काही सांगून जातात.

तो म्हणाला, 'मी खूप भावूक झालो आहे कारण गेले वर्ष खूप कठीण होत. मी ५०० च्या क्रमवारीत होतो. शस्त्रक्रिया झाली होती. फार आर्थिक मदतही नव्हती. खूप चढ-उतार आले. पण आता मी खूप खूश आहे की मला प्रत्येक दिवशी पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे. मला त्यासाठी मार्ग मिळाला आहे.'

Sumit Nagal
Sumit Nagal: भारताच्या सुमीतचा ऐतिहासिक विजय! मानांकित बब्लिकला हारवत ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत

याशिवाय त्याने अशीही आशा व्यक्त केली की यामुळे अनेक खेळाडूंना एकेरीत आपली कारकिर्द घडवण्याची प्रेरणा मिळेल.

दरम्यान, काहीदिवसांपूर्वीच त्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीपर्यंत धडक मारली होती.

जागतिक क्रमवारीत पहिल्या 100 जणांमध्ये स्थान मिळवणारे भारतीय पुरुष टेनिसपटू

  • 1974 - जसजीन सिंग

  • 1974 - आनंद अमृतराज

  • 1975 - शशी मेनन

  • 1980 - विजय अमृतराज

  • 1985 - रमशे कृष्णण

  • 1998 - लिअँडर पेस

  • 2011 - सोमदेव देववर्मन

  • 2018 - युकी भांबरी

  • 2019 - प्रज्ञेश गुण्णेश्वरन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com