Goa university Intercollegiate competition : बास्केटबॉल स्पर्धेत म्हापशाच्या झेवियर्सला दुहेरी किताब

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या स्पर्धेत पुरुष व महिला गटात विजेतेपद
St. Xavier's College Basketball Team
St. Xavier's College Basketball TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa university Intercollegiate competition : गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत म्हापशाच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाने दुहेरी किताब पटकावला. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी पुरुष व महिला गटात विजेतेपद मिळविले.

St. Xavier's College Basketball Team
Mahadayi Water Dispute: अमित शहांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण, म्हादईच्या...

पुरुष गटातील अंतिम लढतीत सेंट झेवियर्सने बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयास 47-34 गुणफरकाने हरविले. महिलांतील अंतिम सामना चुरशीचा ठरला. सेंट झेवियर्सने अटीतटीच्या लढतीत कुजिरा येथील एस. एस. धेंपो महाविद्यालयास 26-25असे एका गुणाने नमविले.

St. Xavier's College Basketball Team
Super Sunday! एकाच दिवसात रंगणार तब्बल 3 फायनल्सचा थरार, टीम इंडियाही...

गोवा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव फादर रालिन डिसोझा, तांत्रिक समिती सदस्य ओलेन्सियो डायस यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

सेंट झेवियर्सच्या महिला संघात ग्रिझेल डायस, वीणा नाईक, चेरिलॅन फर्नांडिस, क्लेअर गोम्स, सीएन डिकॉस्ता, डानेत गोम्स, ख्रिसेन्न नोरोन्हा, चंद्रकांत बोगाटी, शिमेई नॅथन, एस्थर वालिस, कॅसी नुनीस, अतिका सुरिया, तर पुरुष संघात नील फर्नांडिस, रॉयस्टन अरावजो, ब्रेंडन डिकॉस्ता, दीपक गुरीकर, सेलन डायस, जेडन पेस, डेव्हिड मारोत्तिकल, शुभम सिंग, सेल्विन कुएल्हो, ब्रेट सिक्वेरा, जेडन वास, डॅनियल गुदिन्हो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com