Super Sunday! एकाच दिवसात रंगणार तब्बल 3 फायनल्सचा थरार, टीम इंडियाही...

रविवारी तीन वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमधील महत्त्वाचे अंतिम सामने रंगणार आहेत.
Finals On 29 January
Finals On 29 JanuaryDainik Gomantak

रविवारी म्हणजेच 29 जानेवारी क्रीडा चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असणार आहे. कारण या दिवशी एक-दोन नाही, तर तब्बल चार महत्त्वाचे अंतिम सामने खेळवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे अंतिम सामने वेगवेगळ्या 3 क्रीडा स्पर्धांचे आहेत. याच सामन्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

ऑस्ट्रेलियन ओपनचे अंतिम सामने

रविवार सकाळपासूनच क्रीडा चाहत्यांसाठी व्यस्त राहणार आहे. कारण भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजताच ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मधील महिला दुहेरीचा अंतिम सामना बार्बोरा क्रेजिकोवा - कॅटेरिना सिनियाकोवा आणि शुको ओयामा - आयना शिबहारा यांच्यात रंगणार आहे.

त्यानंतर दुपारी 2 वाजता ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मधील पुरुष एकेरीचा अंतिम सामना सुरू होईल. हा सामना सार्बियाचा दिग्गज नोव्हाक जोकोविच विरुद्ध ग्रीसचा स्टिफानोस त्सित्सिपास यांच्यात होईल. जोकोविचचा हा ऑस्ट्रेलियन ओपनमधील 10 वा अंतिम सामना असणार आहे, तर त्सित्सिपासने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना गाठला आहे.

(Important finals of three different sporting events will be played on 29 January)

19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकपचा अंतिम सामना

रविवारीच पहिल्या-वहिल्या 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकपचा अंतिम सामना होणार आहे. हा सामना 19 वर्षांखालील भारतीय महिला विरुद्ध 19 वर्षांखालील इंग्लंड महिला संघांमध्ये होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5.15 वाजता पॉचेफस्ट्रूम येथे सुरू होणार आहे.

या स्पर्धेत भारतीय महिलांनी न्यूझीलंड महिला संघाचा उपांत्य फेरीत पराभूत करत अंतिम सामना गाठला आहे. तसेच इंग्लंडच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियन महिलांचा उपांत्य सामन्यात पराभव केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच खेळवण्यात येत असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचा मान भारत आणि इंग्लंडला मिळाला आहे.

हॉकी वर्ल्डकप 2023 अंतिम सामना

भारतात खेळवण्यात येत असलेल्या हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना देखील 29 जानेवारीलाच खेळवण्यात येणार आहे. हा सामना जर्मनी विरुद्ध बेल्जियम संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता भुवनेश्वरमध्ये सुरुवात होणार आहे.

या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स संघात तिसऱ्या क्रमांकासाठी दुपारी 4.30 वाजता सामना सुरू होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com