PAK vs SL: पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळाले! फायनल भारत वि. श्रीलंका

आशिया कप 2023 च्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला.
Sri Lankan Batsmen
Sri Lankan BatsmenDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2023: आशिया कप 2023 च्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला, जिथे त्याचा सामना 10 व्यांदा आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाशी होणार आहे.

श्रीलंकेचा पराभव करुनच भारताने अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 42 षटकांत 7 गडी गमावून 252 धावा केल्या.

प्रत्युत्तरात श्रीलंकेने 42 षटकांत 8 गडी गमावून 252 धावा करत सामना 2 विकेट्सने जिंकला.

श्रीलंकेच्या विजयात कुसल मेंडिसचा मोलाचा वाटा

दरम्यान, 253 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली. कुसल परेराने फटकेबाजी करत 17 धावा केल्या, मात्र तो धावबाद झाला. यानंतर निसांका आणि मेंडिस यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली.

निसांका 44 चेंडूत 29 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कुसल मेंडिस आणि सदिरा यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली आणि श्रीलंका (Sri Lanka) हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण सदीरा 48 धावा करुन आणि मेंडिस 91 धावा करुन बाद झाला. यानंतर कर्णधार शनाकाला केवळ दोन धावा करता आल्या.

Sri Lankan Batsmen
PAK vs SL: वेलालागेच्या जाळ्यात अडकला बाबर, क्रिकेट चाहतेही बघतच राहिले!

श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 42 षटकात 7 गडी गमावून 252 धावा केल्या होत्या. पावसामुळे सामना सुरुवातीला 45-45 षटकांनी सुरु झाला पण नंतर पावसाच्या व्यत्ययामुळे तो 42-42 षटकांचा करण्यात आला.

पाकिस्तानकडून (Pakistan) मोहम्मद रिझवानने नाबाद 86, अब्दुल्ला शफीकने 52 तर इफ्तिखार अहमदने 47 धावा केल्या. श्रीलंकेकडून मथिशा पाथिरानाने तीन, तर प्रमोद मदुशनने दोन गडी बाद केले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. 5व्या षटकात फखर जमानच्या रुपाने संघाने पहिली विकेट गमावली. यानंतर बाबर आणि शफिक यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली, मात्र ती दुनिथने मोडली. बाबर 29 धावा करुन बाद झाला.

तर अब्दुल्ला 52 धावा करुन बाद झाला. मोहम्मद हारिस (3) आणि नवाज (12) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. सामना सुरु झाल्यानंतर पाकिस्तान संघ 27.4 षटकांत 130 धावांवर 5 गडी गमावून संघर्ष करत होता.

त्याच षटकात पावसाने दणका दिला. त्यानंतर रिझवान आणि इफ्तिखार यांच्या शतकी पाटर्नशिपमुळे पाकिस्तानने उर्वरित 14.2 षटकांत दोन गडी गमावून 130 धावा केल्या होत्या.

Sri Lankan Batsmen
PAK vs SL: मोहम्मद रिझवान-इफ्तिखार अहमद जोडीचा कोलंबोमध्ये मोठा कारनामा, सहाव्या विकेटसाठी...

शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेने विजय मिळवला

अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. असलंकाने शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेत आपल्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले. तो 49 धावा करुन नाबाद परतला.

याशिवाय, संघाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. कुसल परेरा (17) आणि पथुम निसांका (29) धावा करुन बाद झाले. कर्णधार दसुन शनाकाही 2 धावा करुन बाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com