PAK vs SL: मोहम्मद रिझवान-इफ्तिखार अहमद जोडीचा कोलंबोमध्ये मोठा कारनामा, सहाव्या विकेटसाठी...

PAK vs SL: आशिया कप 2023 चा सुपर-4 सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे.
Mohammad Rizwan And Iftikhar Ahmed
Mohammad Rizwan And Iftikhar Ahmed Dainik Gomantak

PAK vs SL: आशिया कप 2023 चा सुपर-4 सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांच्या अर्धशतकांमुळे पाकिस्तानने या सामन्यात सात विकेट्सच्या मोबदल्यात 252 धावा केल्या.

73 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह 86 धावांची नाबाद खेळी खेळण्याबरोबरच रिझवानने इफ्तिखार अहमदसोबत सहाव्या विकेटसाठी 108 धावांची पाटर्नशिप करत पाकिस्तानला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.

या दोघांच्या पाटर्नशिपमुळे पाकिस्तानला शेवटच्या 10 षटकांत 102 धावा काढण्यात यश आले. शफिकनेही 69 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 52 धावा केल्या. यासोबत, या जोडीने आशिया कपमध्ये पाकिस्तानसाठी पाटर्नशिपचा मोठा रेकॉर्ड केला.

दरम्यान, पावसामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाल्याने तो 45 षटकांचा करण्यात आला. सामन्याच्या मध्यावर पुन्हा पाऊस सुरु झाला, त्यामुळे सामन्यातील षटकांची संख्या पुन्हा कमी करुन 42 करण्यात आली.

डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, श्रीलंकेला (Sri Lanka) 252 धावांचे लक्ष्य मिळाले. सामना सुरु झाल्यानंतर पाकिस्तान संघ 27.4 षटकांत 130 धावांवर 5 गडी गमावून संघर्ष करत होता.

त्याच षटकात पावसाने दणका दिला. त्यानंतर रिझवान आणि इफ्तिखार यांच्या शतकी पाटर्नशिपमुळे पाकिस्तान संघाने उर्वरित 14.2 षटकांत दोन गडी गमावून 130 धावा केल्या.

Mohammad Rizwan And Iftikhar Ahmed
PAK vs SL: ऐन मोक्यावर पाकिस्तानच्या प्लेइंग 11 मध्ये बदल, इमाम उल हक अन् सौद शकीलला झालं काय?

दुसरीकडे, या स्पर्धेत पाकिस्तानसाठी (Pakistan) सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी पाटर्नशिप करण्याचा रेकॉर्ड मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. कोलंबोमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत रिझवान आणि इफ्तिखार यांनी 108 धावांची भर घातली.

यापूर्वी, 2008 मध्ये फवाद आलम आणि तनवीरमध्ये 100 धावांची पाटर्नशिप झाली होती. जानेवारी 2018 पासून पाकिस्तानसाठी सहाव्या विकेटसाठीची ही पहिली शतकी पाटर्नशिप आहे. याआधी हरिस सोहेल आणि शादाब खान यांनी न्यूझीलंडविरुद्ध 105 धावा काढल्या होत्या.

Mohammad Rizwan And Iftikhar Ahmed
PAK vs SL: मोहम्मद रिझवाननं पाकिस्तानला सावरलं, श्रीलंकेला दिलं 253 धावांचं लक्ष्य

वनडे आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानसाठी सहाव्या किंवा त्याहून कमी विकेटसाठी सर्वोच्च पाटर्नशिप:

108 - श्रीलंकाविरुद्ध इफ्तिखार अहमद आणि एम रिझवान, कोलंबो, 2023*

100 - एचकेविरुद्ध फवाद आलम आणि एस तन्वीर, कराची, 2008

81 - भारताविरुद्ध इंझमाम-उल-हक आणि डब्ल्यू अक्रम, शारजाह, 1995

71 - BAN विरुद्ध आसिफ अली आणि इमाम-उल-हक, अबू धाबी, 2018

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com