PAK vs SL: वेलालागेच्या जाळ्यात अडकला बाबर, क्रिकेट चाहतेही बघतच राहिले!

Dunith Wellalage vs Babar Azam PAK vs SL: आशिया कप 2023 चा सुपर-4 सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे.
Dunith Wellalage vs Babar Azam
Dunith Wellalage vs Babar AzamDainik Gomantak
Published on
Updated on

Dunith Wellalage vs Babar Azam PAK vs SL: आशिया कप 2023 चा सुपर-4 सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे.

भारताविरुद्ध छाप सोडलेल्या श्रीलंकेच्या 20 वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागेने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

वेलालागेने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज असणाऱ्या बाबर आझमला आपल्या जाळ्यात अशाप्रकारे अडकवले की, क्रिकेट चाहतेही बघतच राहिले. हा नजारा 16 व्या षटकात पाहायला मिळाला.

दरम्यान, वेलालागेच्या गोलंदाजीवर अब्दुल्ला शफीक आणि बाबर आझम झगडताना दिसले. दोन्ही फलंदाजांना षटकातील पाच चेंडूत केवळ 1 धाव काढता आली.

यानंतर शेवटच्या चेंडूचा टर्न आला तेव्हा बाबरने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र वेलालागेने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला.

Dunith Wellalage vs Babar Azam
PAK vs SL: ऐन मोक्यावर पाकिस्तानच्या प्लेइंग 11 मध्ये बदल, इमाम उल हक अन् सौद शकीलला झालं काय?

चेंडू पिच झाला आणि तो थेट यष्टिरक्षक मेंडिसच्या हातात येताच त्याने क्षणाचाही विलंब न करता बेल्स उडवल्या. यानंतर अंपायरने ते चेक केले असता, ज्यामध्ये बेल वाजताना बाबरचा मागचा पाय हवेत असल्याचे दिसून आले.

मात्र, त्याचा पाय खाली होता, त्यामुळे त्याला आऊट न द्यायला पाहिजे होते, असे पाकिस्तानच्या चाहत्यांचे मत आहे.

अशाप्रकारे वेलालागेने आपले शहाणपण दाखवत आणि मेंडिसने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दाखवत बाबर आझमला (Babar Azam) अवघ्या 29 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बाबरने 35 चेंडूत 3 चौकार मारुन या धावा केल्या.

Dunith Wellalage vs Babar Azam
SL vs PAK, 1st Test: पाकिस्तानचा श्रीलंकेवर विक्रमी विजय! भारत-इंग्लंडचा रेकॉर्डही मोडला

दुसरीकडे, भारताविरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात वेलालागे 'हिरो' ठरला होता. त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नसला तरी त्याने प्रथम 5 फलंदाज बाद करुन टीम इंडियाला (Team India) अडचणीत आणले होते.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावत 46 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com