IND vs ENG: ऋषभ पंत कोरोना मुक्त, लवकरच होणार भारतीय संघात सामिल

ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि भारतीय संघाचे तज्ज्ञ दयानंद गरनी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यामुळे त्यांना लंडनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विलगिकरणात होते.
Wicketkeeper Rishabh Pant
Wicketkeeper Rishabh Pant Dainik Gomantak

लंडन: इंग्लंडमध्ये (England) असलेल्या भारतीय संघासाठी (Indian team) एक गुड न्यूज आली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Wicketkeeper Rishabh Pant) आता कोरोनातून (Covid19) बरा झाला असून, त्याचे विलगिकरण देखील दुसऱ्या सराव सामन्याआधी संपणार आहे. त्यामुळे तो दुसऱ्या सराव सामन्यात संघात सहभागी होणार आहे.

पंत इंग्लंडमध्ये असणाऱ्या त्याच्या नातेवाईकाच्या घरी विलगिकरणात आहे. तो पूर्णपणे बरा झाला असून रविवारी त्याचे विलगिकरण संपले आहे. त्यामुळे आता तो लवकरच संघात सामिल होऊ शकेल. तो 22 जुलैपर्यंत संघात सामिल होईल. भारताचा मंगळवार पासून डरहममध्ये सेलेक्ट काउंटी इलेव्हन सोबत सराव सामना खेळणार आहे.

Wicketkeeper Rishabh Pant
युरो कपचा सामना पाहणे पडले महागात, रिषभ पंत कोरोना पॉजिटीव्ह

ऋषभ पंत आणि भारतीय संघाचे तज्ज्ञ दयानंद गरनी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यामुळे त्यांना लंडनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विलगिकरणात होते. तर अभिमन्यू ईश्वरन, रिध्दिमान साहा आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण हे देखील विलगिकरणात होते. यांचे विलगिकरण 24 जुलैला संपणार आहे. या तिघांच्या कोरोना चाचण्या देखील निगेटीव्ह आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com