South African क्रिकेटपटू अडकला डोपिंगमध्ये, बंदी घातलेल्या पदार्थाच्या सेवनावरुन निलंबित

आयसीसीच्या (ICC) डोपिंग विरोधी नियमांनुसार प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी तो दोषी आढळला आहे.
Zubayr Hamza
Zubayr HamzaTwitter/ @OfficialCSA
Published on
Updated on

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज झुबेर हमजा (Zubayr Hamza) डोपिंग प्रकरणात अडकला आहे. आयसीसीच्या (ICC) डोपिंग विरोधी नियमांनुसार प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी तो दोषी आढळला आहे. त्यानंतर हमजाला तत्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने बुधवार 23 मार्च रोजी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. या प्रकरणात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) आपल्या खेळाडूला पूर्ण पाठिंबा दिला आहे. तथापि,आफ्रिकन बोर्डाने म्हटले आहे की, 'झुबेर हमजा हे पदार्थ सेवन केल्याबद्दल दोषी आढळला आहे. मात्र कार्यक्षमता वाढवणारे ते औषध नाही.' South Africa's star batsman Zubayr Hamza is embroiled in a doping case.

दरम्यान, गेल्या महिन्यात न्यूझीलंडमध्ये (New Zealand) झालेल्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग असलेल्या झुबेर हमजाची जानेवारीमध्ये चाचणी करण्यात आली होती. आता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “... आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या डोपिंगविरोधी नियमांतर्गत आयसीसी अँटी-डोपिंग अंतर्गत प्रतिबंधित पदार्थाच्या सेवनासाठी झुबेर हमजा पॉझिटिव्ह आढळला आहे. हा निकाल 17 जानेवारी 2022 रोजी आयसीसी अँटी डोपिंग अंतर्गत घेण्यात आलेल्या चाचणीनंतर आला आहे.

Zubayr Hamza
वर्ल्ड नंबर वन टेनिसपटू एश्ले बार्टीने केली निवृत्तीची घोषणा, VIDEO

झुबेर निलंबनास सहमत

सीएसएने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, ''झुबेरचा या निर्णयावर कोणताही आक्षेप नाही. तो तपासात आयसीसीला पूर्ण सहकार्य करत आहे. बोर्डाने म्हटले आहे की, "झुबेरचा पॉझिटीव्ह चाचणीला विरोध नाही. तो आयसीसीला पूर्ण सहकार्य करत आहे. आणि स्वत: त्याने आयसीसीला लेखी निवेदन पाठवताना तत्काळ निलंबनास सहमती दर्शवली आहे."

झुबेर पॉझिटीव्ह

तथापि, दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाने देखील जोर दिला आहे की, ''झुबेरने बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन कोणत्याही प्रकारे कामगिरी सुधारण्यास मदत करत नाही. “पॉझिटिव्ह चाचणी फ्युरोसेमाइड या पदार्थाशी निगडीत आहे. जो कार्यक्षमता वाढवणारा पदार्थ नाही. तो पदार्थ आपल्या शरिरामध्ये कसा आला याला त्याची कल्पना आहे. या प्रकरणात झुबेरच्या बाजूने कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा नव्हता. झुबेरच्या बाजूने कोणतीही मोठी चूक किंवा गंभीर निष्काळजीपणा झाला नसल्याचा पुरावा सादर केला जाईल.''

Zubayr Hamza
एश्ले बार्टीने रचला इतिहास, गेल्या 44 वर्षात जेतेपद जिंकणारी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू

झुबेर हमजाची कारकीर्द

26 वर्षीय स्टार फलंदाज झुबेर हमजाने 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. मात्र, त्याला आफ्रिकन संघातील स्थान पक्के करता आले नाही. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 1 अर्धशतकाच्या मदतीने 212 धावा केल्या आहेत. तसेच एका वनडेत 56 धावा केल्या. झुबेरने 2019 मध्ये भारत दौऱ्यावर रांची कसोटी खेळली होती. गेल्या महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावरही एक कसोटी खेळली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com