जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या एश्ले बार्टीने इतिहास रचला आहे. तिने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी तिने महिला एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्सचा (Daniel Collins) सरळ सेटमध्ये पराभव केला. बार्टीने (Ashleigh Barty) संपूर्ण स्पर्धेत एकही सेट गमावलेला नाही. (Ashleigh Barty Has Won The Australian Open For The First Time)
दरम्यान, ऑस्ट्रेलियाची (Australia) स्टार खेळाडू बार्टीने 28 वर्षीय कॉलिन्सवर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. आणि पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. यानंतर अमेरिकन खेळाडूने दुसऱ्या सेटमध्ये लढा देण्याचा प्रयत्न केला परंतु बार्टीने दुसरा सेट 7-6 असा जिंकून आपले तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. बार्टीने यापूर्वी 2019 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2021 मध्ये विम्बल्डन जिंकले होते. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बार्टीचा विजय-पराजयाचे रेकॉर्ड आता 24-8 असा आहे. 2022 मध्ये तिने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, जिथे तिला अमेरिकन सोफिया केनिनने पराभूत केले.
तसेच, ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी एश्ले बार्टी ही 1978 नंतरची पहिली ऑस्ट्रेलियन बनली आहे. याआधी ख्रिस ओ' नीलने शेवटच्या वेळी हे विजेतेपद पटकावले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.