SA vs IND: रिंकू सिंगचे झाले पदार्पण! दुसऱ्या ODI साठी अशी आहे भारत - द. आफ्रिकेची 'प्लेइंग-11'

South Africa vs India: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत नाणेफेक जिंकली आहे.
Rinku Singh Debut
Rinku Singh DebutBCCI
Published on
Updated on

South Africa vs India, 2nd ODI at Gqeberha, Playing XI:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना गेकेबेरामधील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला या वनडे मालिकेतून मुक्त करण्यात आले आहे.

Rinku Singh Debut
SA vs IND: सुदर्शनने गाजवलं पदार्पण, तर अर्शदीप-आवेशच्या 9 विकेट्स! पहिल्याच वनडेत रचले विक्रमांचे मनोरे

श्रेयसला आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी मुक्त केले आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर दुसऱ्या वनडेसाठी रिंकू सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यातून रिंकू वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.

तसेच दक्षिण आफ्रिकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. त्यांनी ब्युरान हेंड्रिक्स आणि लिझाद विल्यम्सला संघात संधी दिली आहे.

Rinku Singh Debut
Rinku Singh: रिंकूची तोडफोड बॅटिंग! इतका जोरात सिक्स ठोकला की मीडिया बॉक्सची काचच फुटली, पाहा Video

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • भारत - केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार

  • दक्षिण आफ्रिका - टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅस्सी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, ब्युरान हेंड्रिक्स

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com