SA vs IND: सुदर्शनने गाजवलं पदार्पण, तर अर्शदीप-आवेशच्या 9 विकेट्स! पहिल्याच वनडेत रचले विक्रमांचे मनोरे

South Africa vs India Records: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गला झालेल्या पहिल्या वनडेत साई सुदर्शन, अर्शदीप सिंग आणि आवेश खानने चमकदार कामगिरी करत खास विक्रमांना गवसणी घातली आहे.
Arshdeep Singh - Sai Sudharsan
Arshdeep Singh - Sai Sudharsan X/ICC

South Africa vs India, 1st ODI at Johannesburg, Sai Sudharsan, Arshdeep Singh, Avesh Khan Records:

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (17 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गला झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यासह या सामन्यात काही विक्रमही झाले.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 117 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 2 विकेट्स गमावत 16.4 षटकात सहज पूर्ण केला. भारताकडून साई सुदर्शनने सर्वाधिक नाबाद 55 धावांची खेळी केली. तसेच श्रेयस अय्यरने 52 धावा केल्या.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून अर्शदीप सिंग आणि आवेश खाननेही प्रभावी गोलंदाजी करत एकत्र मिळून 9 विकेट्स घेतल्या. अर्शदीपने 10 षटकात 37 धावांत 5 विकेट्स घेतल्या. तसेच आवेशने 8 षटकात 27 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्यांच्या या गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव 27.3 षटकात 116 धावांवर संपुष्टात आला.

Arshdeep Singh - Sai Sudharsan
SA vs IND, ODI: टीम इंडियाने द. आफ्रिकेला दिवसा दाखवले तारे! पहिल्या वनडेत मिळवला सोपा विजय

या सामन्यात झालेले विक्रम

सुदर्शनचा पदार्पणात जलवा.

साई सुदर्शनने 43 चेंडूत 9 चौकारांसह 55 धावांची खेळी केली. त्यामुळे तो वनडे पदार्पणात 50 धावांचा टप्पा पार करणारा भारताचा चौथाच सलामीवीर ठरला. यापूर्वी रॉबिन उथप्पा, केएल राहुल आणि फेझ फैजल यांनी वनडे पदार्पणात सलामीला फलंदाजी करताना 50 हून अधिक धावा केल्या होत्या.

दरम्यान, वनडे पदार्पणात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा सुदर्शन एकूण 17 वा भारतीय खेळाडू आहे.

वनडे पदार्पणात सर्वोच्च खेळी करणारे भारतीय सलामीवीर

  • 100* धावा - केएल राहुल (विरुद्ध झिम्बाब्वे, 2016)

  • 86 धावा - रॉबिन उथप्पा (विरुद्ध इंग्लंड, 2006)

  • 55* धावा - साई सुदर्शन (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2023)

  • 55* धावा - फेझ फैझल (विरुद्ध झिम्बाब्वे, 2016)

Arshdeep Singh - Sai Sudharsan
SA vs IND: ईशान किशन कसोटी मालिकेतून बाहेर! BCCI केली बदली खेळाडूची घोषणा

अर्शदीपच्या पाच विकेट्स

अर्शदीपने या सामन्यात पाच विकेट्स घेतल्याने त्याने दोन मोठे विक्रम केले आहेत. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत पाच विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच वेगवान गोलंदाज आहे. तसेच भारताचा एकूण चौथा गोलंदाज आहे.

यापूर्वी सुनील जोशी, युजवेंद्र चहल आणि रविंद्र जडेजा यांनी असा पराक्रम केला आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की सुनील जोशी, युझवेंद्र चहल आणि रविंद्र जडेजा हे तिघेही फिरकी गोलंदाज आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत सर्वोत्तम गोलंदाजी करणारे भारतीय क्रिकेटपटू

  • 5/6 - सुनील जोशी (नैरोबी, 1999)

  • 5/22 - युजवेंद्र चहल (सेंच्युरियन, 2018)

  • 5/33 - रविंद्र जडेजा (कोलकाता, 2023)

  • 5/37 - अर्शदीप सिंग (जोहान्सबर्ग, 2023)

अर्शदीप-आवेशचा विक्रम

या सामन्यात अर्शदीप आणि आवेश या दोन वेगवान गोलंदाजांच्या जोडीने मिळून 9 विकेट्स घेतले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम या सामन्यात झाला.

यापूर्वी मोहालीमध्ये 1993 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी 8 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच सेंच्युरियनला २०१३ साली झालेल्या वनडेतही भारतीय वेगवान गोलंदाजांनी मिळून 8 विकेट्स घेतल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com