Rinku Singh: रिंकूची तोडफोड बॅटिंग! इतका जोरात सिक्स ठोकला की मीडिया बॉक्सची काचच फुटली, पाहा Video

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात रिंकू सिंगने ठोकलेल्या एका सिक्सने स्टेडियममधील मीडिया बॉक्सची काच फुटली.
India vs South Africa | Rinku Singh
India vs South Africa | Rinku SinghX
Published on
Updated on

Rinku Singh broken glass of media box with a six during India vs South Africa 2nd T20I match at Gqeberha:

मंगळवारी (12 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाचा वापर करण्यात आला होता. दरम्यान, गेकेबराला झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पराभव स्विकारला असला, तरी रिंकू सिंगच्या फलंदाजीने मात्र अनेकांची मनं जिंकली,

रिंकूने या सामन्यात अर्धशतक झळकावले, हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतीलही पहिले अर्धशतक ठरले. दरम्यान, या अर्धशतकी खेळीदरम्यान त्याने मारलेल्या एका षटकाराने चक्क स्टेडियममधील मीडिया बॉक्सची काच फुटली.

India vs South Africa | Rinku Singh
SA vs IND: सूर्यकुमारचा T20I मध्ये मोठा पराक्रम! विराटची बरोबरी तर केलीत, पण 'हे' 3 विक्रमही रचले

रिंकूने 39 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. तो तिलक वर्माची विकेट गेल्यानंतर 6 व्या षटकात फलंदाजीला आला होता.

त्याने सुरुवातीलाच चौकार ठोकत आपल्या खेळीची सुरुवात केली होती. पण त्यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव आक्रमक खेळत असल्याने रिंकूने संयमी खेळ केला. परंतु, सुर्यकुमार 14 व्या षटकात बाद झाल्यानंतर मात्र रिंकून आक्रमक पवित्रा स्विकारला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या जवळपास सर्वच गोलंदाजांवर हल्लाबोल केला होता.

यावेळी १९ व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम गोलंदाजी करत असताना रिंकूने अखेरच्या दोन चेंडूवर दोन खणखणीत षटकार मारले. त्याने पहिला षटकात लाँग-ऑनला मारला, तर दुसरा षटकात त्याने इतका जोरात मारला की तो थेट मीडिया बॉक्सच्या काचेला जाऊन लागला. त्यामुळे ती काचही फुटली. त्याचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत आहेत.

India vs South Africa | Rinku Singh
SA vs IND: दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या T20I मध्ये रोमांचक विजय! सूर्या-रिंकूचे अर्धशतक व्यर्थ

दरम्यान, 20 षटकात भारताने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर अनुक्रमे रविंद्र जडेजा आणि आर्शदीप सिंग यांच्या विकेट्स गमावल्या. पण त्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाल्याने काहीवेळ सामना थांबवण्यात आला होता. त्यावेळी भारताच्या 19.3 षटकात 7 बाद 180 धावा झाल्या होत्या.

भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. पावसामुळे अडथळा आल्याने दक्षिण आफ्रिकेसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 152 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 13.5 षटकात 5 विकेट्स गमावत 154 धावा करत पूर्ण केले.

दक्षिण आफ्रिकेकडून रिझा हेंड्रिक्सने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तसेच मार्करमने ३० धावांची खेळी केली. तसेच अन्य फलंदाजांनी छोटेखानी खेळी करत योगदान दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com