Virat Kohli: शानदार जबरदस्त जिंदाबाद! विराटचं 49 व्या ODI शतकासह बर्थडे गिफ्ट, सचिनचीही बरोबरी

India vs South Africa: विराट कोहलीने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 35 व्या वाढदिवशी ४९ वे वनडे शतक करत सचिनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.
Virat Kohli
Virat Kohli

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs South Africa, Virat Kohli 49th ODI Century:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी (5 नोव्हेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सामना होत आहे. कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक करत मोठा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे विराट रविवारी त्याचा 35 वा वाढदिवसही साजरा करत आहे.

विराटचे हे वनडे कारकिर्दीतील 49 वे वनडे शतक आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 79 वे शतक आहे. त्यामुळे विराटने सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिननेही वनडेमध्ये 49 शतके केली आहे.

त्यामुळे आता वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर विराट आणि सचिन संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आले आहेत.

Virat Kohli
HBD Virat Kohli: विराट कोहलीचा प्रवास म्हणजे दिल्ली का छोरा ते क्रिकेटचा 'किंग'

इतकेच नाही तर विराटने 49 वनडे शतके 277 डावातच पूर्ण केले आहे. त्यामुळे त्याने 49 वनडे शतके करण्यासाठी सचिनपेक्षा तब्बल 174 डाव कमी खेळले आहेत. सचिनने 451 डावात 49 वनडे शतके पूर्ण केली होती.

वनडेत सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू -

  • 49 शतके - विराट कोहली (289 सामने)

  • 49 शतके - सचिन तेंडुलकर (463 सामने)

  • 31 शतके - रोहित शर्मा (259 सामने)

  • 30 शतके - रिकी पाँटिंग (375 सामने)

  • 28 शतके - सनथ जयसूर्या (445 सामने)

Virat Kohli
World Cup 2023: 'भारताला कोणीही रोखू शकत नाही...,' टीम इंडियाच्या विजयानंतर शोएब अख्तरची रिअ‍ॅक्शन

वनडे वर्ल्डकपमध्येही शतक

विराट हा वर्ल्डकपमध्ये वाढदिवशी शतक करणारा केवळ तिसराच क्रिकेटपटू आहे. यापूर्वी रॉस टेलर आणि मिचेल मार्श यांनी वनडे वर्ल्डकपमध्ये वाढदिवशी शतक करण्याचा पराक्रम केला आहे.

न्यूझीलंडच्या रॉस टेलरने 2011 वर्ल्डकपमध्ये 8 मार्च रोजी त्याच्या वाढदिवशी पाकिस्तानविरुद्ध 131 धावांची खेळी केली होती. तसेच काहीच दिवसांपूर्वी म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने त्याच्या वाढदिवशी बंगळुरूला पाकिस्तानविरुद्धच 121 धावांची खेळी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com