स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सोनू सुदची भारताचा ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड

2022 ला रूसमध्ये होणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये भारताचा ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणून सोनू सुदची निवड (Selection) करण्यात आली आहे.
Sonu Sood
Sonu SoodInstagram/@sonu_sood
Published on
Updated on

बॉलीवुड (Bollywood) अभिनेता सोनू सुद (Sonu Sood) गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे राहिला आहे. विशेष म्हणजे कोरोना (Corona) काळात त्याने अनेक गरजूंना मदत केली. 2022 ला रूसमध्ये होणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये भारताचा ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर (Brand Ambassador) म्हणून सोनू सुदची निवड (Selection) करण्यात आली आहे. याबाबत सोनूने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) माहिती दिली आहे.

यामध्ये त्याने जर्सी घालून स्पेशल ऑलिम्पिक रेड बॉलसोबत पोज देतांनाचा फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे. यात त्याने लिहिले की, " 2022 मध्ये रूसमधील स्पेशल ऑलिम्पिकमध्ये भारताचा ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून माझी निवड करण्यात आल्याने आज अभिमान वाटतो! मला खात्री आहे की, आमचे चॅम्पियन खेळाडू देशाला अभिमान वाटले अशी कामगिरी करतील आणि मी त्यांना खूप शुभेच्छा देतो! जय हिंद."

Sonu Sood
India Vs England: भारतीय संघाची ओपनिंगची समस्या अजुन वाढली

याबाबत बोलताना तो म्हणाला, "आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. या प्रवासात सहभागी होण्याची मला संधी मिळाली याचा मला आनंद आहे. स्पेशल व्यक्तींना प्रोत्साहन देताना तो पुढे म्हणाला, "मी त्यांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. स्पेशल ऑलिम्पिक इंडियाचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. मी या कुटुंबाचा एक भाग आहे. हे व्यासपीठ आणखी मोठे बनवण्यासाठी आणि देशभरातील लोकांशी जोडण्यासाठी मी प्रयत्न करेन.

Sonu Sood
Tokyo Olympics: भारतीय हॉकी टीम फायनलमधून बाहेर,पेनल्टी स्ट्रोकेने केला घात

सोनू स्पेशल ऑलिम्पिक इंडिया अॅथलीट्सच्या टीमचे नेतृत्व करणार आहे. तो जानेवारी 2022 मध्ये स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्समध्ये भाग घेण्यासाठी कझानला जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com