Pathum Nissanka Double Century: पथुम निसांकाने झळकावले 'द्विशतक', सनथ जयसूर्याचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास

Pathum Nissanka Double Century SL vs AFG: श्रीलंकेचा स्टार फलंदाज पथुम निसांकाने 210 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. या खेळीत निसांकाने 139 चेंडूंचा सामना करत 20 चौकार आणि 8 षटकार ठोकले.
Pathum Nissanka Double Century
Pathum Nissanka Double CenturyDainik Gomantak

Pathum Nissanka Double Century SL vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा स्टार फलंदाज पथुम निसांकाने 210 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. या खेळीत निसांकाने 139 चेंडूंचा सामना करत 20 चौकार आणि 8 षटकार ठोकले. अशाप्रकारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो श्रीलंकेचा पहिला फलंदाज ठरला. त्याचबरोबर त्याने वनडे सामन्याच्या एका डावात पाचवी सर्वोच्च धावसंख्या केली. या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 धावा केल्या होत्या. आता तो एकदिवसीय डावात श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

जयसूर्याचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला

याआधी श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाची सर्वोत्तम धावसंख्या 189 धावा होती, जी सनथ जयसूर्याने केली होती. जयसूर्याने 2000 मध्ये भारताविरुद्ध 189 धावांची इनिंग खेळली होती. आता 24 वर्षांनंतर 2024 मध्ये निसांकाने अफगाणिस्तानविरुद्ध 210 धावा करत इतिहास रचला. त्याने 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 210 धावा करणाऱ्या पाकिस्तानच्या फखर जमानची बरोबरी केली. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याची ही 12वी वेळ आहे.

Pathum Nissanka Double Century
SL vs AFG: काका-पुतण्याच्या जोडीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाल, श्रीलंकेच्या गोलंदाजांना झोडपले

एकदिवसीय डावातील पाच सर्वोच्च धावा

रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, 2014- 264 धावा

मार्टिन गुप्टिल विरुद्ध वेस्ट इंडिज, 2015 – नाबाद 237 धावा

वीरेंद्र सेहवाग विरुद्ध वेस्ट इंडिज, 2011- 219 धावा

ख्रिस गेल विरुद्ध झिम्बाब्वे, 2015 - 215 धावा

फखर जमान विरुद्ध झिम्बाब्वे, 2018 – 210 नाबाद

पथुम निसांका विरुद्ध अफगाणिस्तान, 2024 – 210 नाबाद

Pathum Nissanka Double Century
IND vs AFG, Video: जर विराट नसता, तर कदाचीत सुपर ओव्हर झालीच नसती, पाहा किंग कोहलीची अफलातून फिल्डिंग

वनडेत द्विशतक करणारा 10वा फलंदाज

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा पथुम निसांका हा 10वा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी भारताच्या रोहित शर्मा, ईशान किशन, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि शुभमन गिल यांनी ही कामगिरी केली होती. याशिवाय ख्रिस गेल, मार्टिन गप्टिल, ग्लेन मॅक्सवेल, फखर जमान यांनीही हा पराक्रम केला आहे. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनदा ही कामगिरी केली असून अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याच्याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाहून अधिक द्विशतक झळकावलेले नाही.

Pathum Nissanka Double Century
IND vs AFG: कॅप्टन रोहितचा धोनीच्या वर्चस्वाला धक्का! भारताचा ठरला सर्वात यशस्वी T20I कर्णधार

श्रीलंकेने मोठी धावसंख्या उभारली

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली. प्रथम खेळताना श्रीलंकेच्या संघाने 3 गडी गमावून 381 धावा केल्या. या डावात सलामीला आलेला पथुम निसांका पहिल्या षटकापासून शेवटच्या चेंडूपर्यंत तिथेच राहिला. त्याच्या 210 धावांच्या खेळीशिवाय दुसरा सलामीवीर अविष्का फर्नांडोने 88 धावांची खेळी खेळली. अखेरीस सदिरा समरविक्रमाने 36 चेंडूत 49 धावा केल्या. अफगाणिस्तानचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आला असून येथे तीन एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com