IRE vs IND, 1st T20I: बॅरीने रचला इतिहास, भारताविरुद्ध अशी कामगिरी कोणीही केली नाही!

IRE vs IND, 1st T20I: आयर्लंड संघाचा स्टार गोलंदाज बॅरी मॅककार्थीने भारताविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दमदार फलंदाजी करत विक्रम केला.
Barry McCarthy
Barry McCarthyDainik Gomantak
Published on
Updated on

IRE vs IND, 1st T20I: आयर्लंड संघाचा स्टार गोलंदाज बॅरी मॅककार्थीने भारताविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दमदार फलंदाजी करत विक्रम केला.

बॅरी मॅककार्थी हा टीम इंडियाविरुद्ध (Team India) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 व्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

डब्लिनमधील द व्हिलेज येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात बॅरी मॅककार्थीने कठीण परिस्थितीत अर्धशतक ठोकले.

दरम्यान, यजमान आयर्लंडविरुद्ध भारतीय वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनी कहर केला असताना 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बॅरी मॅककार्थीने 33 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 51 धावांची नाबाद खेळी साकारली.

त्याच्या या दमदार फलंदाजीमुळे आयर्लंडचा संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 20 षटकांत 7 गडी गमावून 139 धावा केल्या.

Barry McCarthy
IRE vs IND, 1st T20I: डेब्यू मॅचमध्ये कृष्णाचा जलवा, आयर्लंडच्या फंलदाजांना दाखवलं आस्मान

दुसरीकडे, या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने आपल्या संघासाठी आतापर्यंत 42 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु त्याने एकदाही अर्धशतक झळकावले नव्हते. मात्र, येथे त्याने अर्धशतक झळकावले.

त्याच्यासमोर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंगसारखे वेगवान गोलंदाज होते, परंतु त्याने संघासाठी साजेशी खेळी खेळली. त्याने संघाच्या धावसंख्येमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आयरिश संघाकडून कुर्तिश कॅम्परने 33 चेंडूत 39 धावांची साकारली.

Barry McCarthy
IRE vs IND T20I: T20 च्या इतिहासात कुणाचा वरचष्मा? जसप्रीत बुमराहसमोर असणार 'हे' आव्हान

T20I मध्ये 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारताविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या

51 धावा* - बॅरी मॅककार्थी, मालाहाइड 2023

41 धावा - केशव महाराज, त्रिवेंद्रम 2022

33 धावा* - डेव्हिड विली, बर्मिंगहॅम 2022

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com