Shubman Gill Record: टीम इंडियाचा स्टार ओपनिंग बॅट्समन शुभमन गिल आयसीसी वनडे रँकिंगमध्ये वर्चस्व मिळवण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
बुधवारी जाहीर झालेल्या वनडे फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत, गिल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमपेक्षा फक्त 10 रेटिंग पॉंइट मागे आहे. गिलचे सध्या 847 रेटिंग पॉंइट असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तर बाबर 857 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात गिल नंबर वन फलंदाज बनू शकतो, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, बाबरला मागे टाकण्यात गिलला यश आले नसले तरी त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि एमएस धोनी यांचे विक्रम मोडीत काढले आहेत. खरे तर, भारतासाठी सर्वाधिक वनडे रेटिंग पॉंइट मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत गिल चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
गांगुलीने त्याच्या कारकिर्दीत 844 वनडे रेटिंग पॉंइट मिळवले तर धोनीने 836 वनडे रेटिंग मिळवले. या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने 911 रेटिंग पॉइंट्स मिळवले होते. सचिन तेंडुलकर (887) दुसऱ्या क्रमांकावर आणि रोहित शर्मा (885) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
911 - विराट कोहली
887 - सचिन तेंडुलकर
885 - रोहित शर्मा
847 - शुभमन गिल
844 - सौरव गांगुली
836 - एमएस धोनी
813 - शिखर धवन
811 - मोहम्मद अझरुद्दीन
गिल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली. गिलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 74 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 104 धावा केल्या.
गिलला शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. गिलने यापूर्वी आशियाई चषक 2023 मध्ये आपल्या बॅटने जलवा दाखवून दिला. दोन अर्धशतकं झळकावण्यासोबतच त्याने या स्पर्धेतही शतक झळकावलं.
गिलने 2020 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत 35 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 66.10 च्या सरासरीने 1917 धावा केल्या आहेत, ज्यात 6 अर्धशतके आणि 9 शतके आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.