Shubman Gill: गिल ठेवतोय दिग्गजांच्या पावलावर पाऊल! सहाव्या वनडे शतकासह विराट-तेंडुलकरच्या पंक्तीत सामील

IND vs AUS: इंदूर वनडेत शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली.
Shubman Gill
Shubman Gill
Published on
Updated on

Shubman Gill 6th ODI Century during India vs Australia 2nd ODI at Indore:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी झाला. इंदूरला झालेल्या या सामन्यात भारताने 99 धावांनी विजय मिळवला. भारताकडून श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलने शतके साजरी केली. दरम्यान, शुभमन गिलने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली.

या सामन्यात 24 वर्षीय शुभमन गिलने 97 चेंडूत 104 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील 6 वे शतक ठरले, तर यावर्षीचे हे त्याचे एकूण 5 वे शतक ठरले.

Shubman Gill
Shreyas Iyer: 'तो क्रमांक हिरावण्याचा...' विराटच्या जागा घेण्याबद्दल अय्यरने स्पष्टच सांगितले

त्यामुळे गिल भारतासाठी सर्वात जलद सहावे वनडे शतक करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने 35 व्या डावात 6 वे शतक केले आहे. हा विक्रम करताना त्याने शिखर धवनला मागे टाकले आहे. शिखर धवनने 46 डावात 6 वनडे शतके केली होती. तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे. त्याने 53 डावात 6 शतके केली होती.

सर्वात कमी डावात भारतासाठी 6 वनडे शतके करणारे खेळाडू

  • 35 डाव - शुभमन गिल

  • 46 डाव - शिखर धवन

  • 53 डाव - केएल राहुल

  • 61 डाव - विराट कोहली

  • 68 डाव - गौतम गंभीर

दिग्गजांच्या यादीत समावेश

दरम्यान, गिल एकाच वर्षात वनडेत 5 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा सातवा भारतीय क्रिकेटपटूही ठरला आहे. त्याच्यापूर्वी विराट कोहलीने 2012, 2017, 2018 आणि 2019 साठी 5 पेक्षा अधिक शतके केलेली.

तसेच रोहित शर्माने 2017, 2018, 2019 या तीनवर्षी 5 पेक्षा अधिक शतके केली आहेत. सचिन तेंडुलकरने 1996 आणि 1998 या दोनवर्षी वनडेत 5 पेक्षा अधिक शतके केली आहेत. त्याचबरोबर राहुल द्रविड (1999), सौरव गांगुली (2000), आणि शिखर धवन (2013) यांनी प्रत्येकी एकदा वर्षात 5 हून अधिक वनडे शतके केली आहेत.

Shubman Gill
IND vs AUS: डावखुरा वॉर्नर अचानक करू लागला उजव्या हाताने बॅटिंग, नक्की काय झालं वाचा

त्याचबरोबर गिल वयाची 25 वर्षे पूर्ण करण्याआधी वनडेत एका वर्षात 5 किंवा त्यापेक्षा अधिक वनडे शतके करणारा जगातील पाचवाच फलंदाज आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर (1996), ग्रॅमी स्मिथ (2005), उपुल थरंगा (2006) आणि विराट कोहली (2012) यांनी असा कारनामा केला होता.

भारताने जिंकला सामना

इंदूर वनडेत भारताकडून गिल व्यतिरिक्त श्रेयस अय्यरने 105 धावांची शतकी खेळी केली. तसेच कर्णधार केएल राहुलने (52) आणि सूर्यकुमार यादव (72) धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकाच 5 बाद 399 धावा केल्या होत्या.

त्यानंतर पावसामुळे ऑस्ट्रेलियासमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 33 षटकात 317 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 28.2 षटकात 217 धावांवर सर्वबाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com