IPL 2023:W, W, W, W...! चार चेंडूत चार विकेट्स अन् हार्दिकच्या गुजरातचा लखनऊवर रोमांचक विजय

आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सला अखेरच्या षटकात पराभूत केले.
Gujarat Titans
Gujarat TitansDainik Gomantak
Published on
Updated on

Lucknow Super Giants vs Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (22 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरातने अखेरच्या षटकात 7 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात गुजरातने लखनऊसमोर विजयासाठी 136 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 षटकात 7 बाद 128 धावाच करता आल्या. लखनऊकडून कर्णधार केएल राहुलने 61 चेंडूत 8 चौकारांसह 68 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. पण अन्य फलंदाजांनी खास काही केले नाही.

Gujarat Titans
IPL 2023: चेपॉकवर 'कॉनवे' चा जलवा, CSK ने सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सने केला पराभव

रोमांचक अखेरचे षटक

अखेरच्या षटकात लखनऊला 12 धावांची गरज होती. या षटकात गुजरातकडून मोहित शर्माने गोलंदाजी केली. त्याने दुसऱ्या चेंडूवर लखनऊचा केएल राहुलला जयंत यादवच्या हातून झेलबाद केले. तिसऱ्या चेंडूवर मार्कस स्टॉयनिस (0) डेव्हिड मिलरच्या हातात झेल देत बाद झाला.

त्यानंतर चौथ्या चेंडूवर आयुष बदोनी (8) आणि पाचव्या चेंडूवर दीपक हुडा (2) धावबाद झाले. त्यामुळे अखेरच्या षटकात लखनऊने सलग चार चेंडूत चार विकेट्स गमावल्या. अखेरच्या चेंडूवरही मोहितने एकही धाव दिली नाही. त्यामुळे लखनऊला विजयापर्यंत पोहचण्यातही अपयश आले.

दरम्यान, लखनऊकडून केएल राहुल आणि काईल मेयर्स यांनी चांगली सुरुवात दिली होती. त्यांनी सलामील 55 धावांची भागीदारीही रचली. पण मेयर्स 24 धावा करून 7 व्या षटकात बाद झाला. त्यानंतर केएल राहुलला कृणाल पंड्याने चांगली साथ देताना दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. पण त्यांची भागीदारी 15 व्या षटकात नूर अहमदने कृणालला 23 धावांवर बाद केले.

त्यानंतर मात्र, गुजरातच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करताना लखनऊला प्रत्येक धावेसाठी झगडायला भाग पाडले. त्यातच निकोलस पूरन 7 चेंडूत 1 धाव करून बाद झाला. त्याचा हार्दिक पंड्याने शानदार झेल घेतला. दरम्यान केएल राहुलने अर्धशतक केले, पण अखेर शेवटच्या षटकात मोहितने केलेल्या शानदार गोलंदाजीसमोर लखनऊच्या फलंदाजांना मोठे फटके खेळता आले नाही.

गुजरातकडून नूर अहमदने शानदार गोलंदाजी करताना 4 षटकात 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहितने 3 षटकात 17 धावांत 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय राशीद खानने 1 विकेट घेतली. मोहम्मद शमीला विकेट मिळाली नाही, पण त्यानेही शानदार गोलंदाजी करताना 3 षटकात केवळ 18 धावाच खर्च केल्या.

Gujarat Titans
IPL 2023: स्टोक्स कधी करणार कमबॅक? CSK कोचकडून महत्त्वाचे अपडेट्स, धोनीच्या दुखापतीबद्दलही सांगितले

हार्दिकची कॅप्टन्स इनिंग

तत्पूर्वी, गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण शुभमन गिल शुन्यावरच बाद झाला. पण वृद्धिमान साहा आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी गुजरातचा डाव सावरताना 68 धावांची भागीदारी केली. पण त्यांची भागीदारी साहाला 47 धावांवर कृणाल पंड्याने बाद करत तोडली.

पण, त्यानंतर अभिनव मनोहर आणि विजय शंकर यांनीही स्वस्तात विकेट्स गमावल्या. यावेळी लखनऊच्या गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी करताना फार मोठे फटके गुजरातच्या फलंदाजांना खेळू दिले नव्हते.

अखेरच्या षटकात एक बाजू सांभाळत अर्धशतक केलेल्या हार्दिक पंड्याला आणि डेव्हिड मिलरला मार्कस स्टॉयनिसने बाद केले. मिलरने 12 चेंडूत 6 धावा केल्या. तर हार्दिकने गुजरातकडून सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. त्याने ही खेळी 50 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकार मारले.

लखनऊकडून कृणाल पंड्याने 4 षटकात 16 धावांत 2 विकेट्स घेतल्या. तसेच मार्कस स्टॉयनिसने २० धावांत २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर नवीन उल हकने 19 धावांत 1 विकेट घेतली, तर अमित मिश्राने 9 चेंडूत 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com