U19 World Cup Final: U19 टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकताच सिनियर्सचा 'कल्ला', Video Viral

19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने 19 वर्षांखालील टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर सिनियर संघाने मोठा जल्लोष केला.
Senior India Women Team celebrate U19 India Women Team
Senior India Women Team celebrate U19 India Women TeamDainik Gomantak

U19 Women's T20I World Cup 2023: रविवारी 19 वर्षांखालील महिला टी20 वर्षांखालील वर्ल्डकप ट्रॉफी शफाली वर्मा कर्णधार असलेल्या युवा भारतीय संघाने जिंकली. अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने 19 वर्षांखालील इंग्लंड महिला संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. युवा भारतीय महिलांच्या या विजयानंतर भारतभरात आनंद साजरा झाला.

हा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेत पार पडला. विशेष म्हणजे सध्या भारताचा वरिष्ठ महिला संघही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. त्यांनी 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाचा वर्ल्डकपमधील अंतिम सामना एका स्क्रिनवर पाहिला.

Senior India Women Team celebrate U19 India Women Team
U19 World Cup Final: विश्वविजयाचा आनंदच न्यारा! वर्ल्डकप जिंकताच U19 Team India चा भन्नाट डान्स

ज्यावेळी 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून सौम्या तिवारीने विजयी धाव घेतली, त्यावेळी भारताच्या वरिष्ठ संघाने जल्लोष केला. यावेळी स्मृती मानधना, जेमिमाह रोड्रीग्ज, हरमनप्रीत कौर यांच्यासह सर्व भारतीय खेळाडूंनी युवा भारतीय संघाच्या विश्वविजयाचा आनंद साजरा केला.

या जल्लोषाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

भारतीय महिलांचे पहिले आयसीसी विजेतेपद

महत्त्वाची गोष्ट अशी 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने जिंकलेला टी20 वर्ल्डकप भारतीय महिला क्रिकेटमधील पहिले आयसीसीचे विजेतेपद ठरले आहे. यापूर्वी अनेकदा भारतीय महिला संघ आयसीसी स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहचला होता, पण विजेतेपद मिळवता आले नव्हते.

(Senior Indian Women Team celebrate U19 India Women team's U19 T20I World Cup win)

Senior India Women Team celebrate U19 India Women Team
U19 Team India च्या पोरींचा संघर्षही मोठाच! कोणाचे वडील शिपाई, कोणाच्या आईने सोसले घाव

भारतीय महिला संघाचा विजय

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतासमोर इंग्लंडने 69 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 14 षटकातच पूर्ण केला. भारतीय संघाकडून 69 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला खेळायला आलेल्या शफली वर्मा (15) आणि श्वेता सेहरावत (5) यांनी लवकर विकेट्स गमावल्या होत्या.

मात्र सौम्या तिवारी आणि गोंगाडी त्रिशा यांनी डाव सावरताना तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी रचत भारताचा विजय सोपा केला. सौम्याने 14 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विजयी धाव काढत भारताचा विजय निश्चित केला. त्रिशाने 24 आणि सौम्याने नाबाद 24 धावा केल्या.

तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना इंग्लंडला 17.1 षटकात 68 धावांवरच रोखले होते. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. भारताकडून तितास साधू, अर्चना देवी आणि पार्शवी चोप्रा या तिघींनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच शफाली वर्मा, मन्नत कश्यप आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com