क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच! एकानं ठोकलं ताबडतोब त्रिशतक, दुसऱ्याचं द्विशतक; 50 ओव्हर्समध्ये उभा केला 822 धावांचा डोंगर

Scorpions Cricket Club: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा चौकार आणि षटकारांचा पाऊस पडताना आपण पाहिला आहे, पण झिम्बाब्वेमधील एका स्थानिक स्पर्धेत धावांचा असा महापूर आला की क्रिकेटचे सर्व जुने रेकॉर्ड्स वाहून गेले.
Scorpions Cricket Club
Scorpions Cricket ClubDainik Gomantak
Published on
Updated on

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा चौकार आणि षटकारांचा पाऊस पडताना आपण पाहिला आहे, पण झिम्बाब्वेमधील एका स्थानिक स्पर्धेत धावांचा असा महापूर आला की क्रिकेटचे सर्व जुने रेकॉर्ड्स वाहून गेले. 'मसविंगो ५० ओव्हर फर्स्ट लीग'मध्ये स्कॉर्पियन्स क्रिकेट क्लबने (SCC) ५० षटकांत तब्बल ८२२ धावा ठोकून जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ५० षटकांच्या सामन्यात जिथे ३०० ते ३५० धावा आव्हानात्मक मानल्या जातात, तिथे या संघाने जवळपास तिप्पट धावा फलकावर लावल्या.

फलंदाजांचे तांडव: एकाने ठोकले त्रिशतक, तर दुसऱ्याचे द्विशतक

स्कॉर्पियन्स क्रिकेट क्लब आणि मीथेन लायन्स यांच्यातील हा सामना मसविंगो स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर पार पडला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉर्पियन्सच्या फलंदाजांनी मैदानाचा ताबा घेतला.

सलामीवीर तकुंडा मडम्बो आणि विनफेड मटेंडे यांनी ४१४ धावांची तुफानी भागीदारी रचली. मटेंडेने अवघ्या ७५ चेंडूत २०३ धावांची खेळी केली. मात्र, खरा धमाका केला तो तकुंडा मडम्बोने. त्याने १४३ चेंडूत ५० चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ३०२ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली आणि तो निवृत्त झाला.

Scorpions Cricket Club
Goa CM Pramod Sawant: सोने खरेदीवर संयम ठेवा! लोकांनी पंतप्रधान मोदींचे आवाहन गांभीर्याने घ्यावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

८२२ धावांचे लक्ष्य

केवळ सलामीवीरच नव्हे, तर खालच्या क्रमांकावर आलेल्या गेब्रियल जाया यानेही ११० धावांची आक्रमक खेळी केली, तर विन्सेंट मोयोने ३९ चेंडूत ७८ धावा जोडल्या. या चौघांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर स्कॉर्पियन्सने ४ गड्यांच्या मोबदल्यात ८२२ धावा केल्या. या डावात विक्रमी चौकार आणि षटकारांची आकडेवारी पाहून चेंडू टाकणारे गोलंदाज अक्षरशः हतबल झाले होते.

७९४ धावांनी विजय; एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय

८२३ धावांच्या अशक्यप्राय लक्षाचा पाठलाग करताना मीथेन लायन्सच्या संघाची अवस्था अतिशय बिकट झाली. अवघ्या ७.५ षटकांत त्यांनी ७ गडी गमावून फक्त २८ धावा केल्या आणि सामना तिथेच थांबवण्यात आला.

स्कॉर्पियन्स क्रिकेट क्लबने ७९४ धावांच्या प्रचंड फरकाने हा सामना जिंकला. त्यांच्याकडून एम्मानुएल दुबे ज्युनियरने ४, तर तवाननयशा कसौंडो याने ३ बळी घेतले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा धावांच्या फरकाने मिळालेला आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com