Prithvi Shaw Selfie Controversy: भारतीय क्रिकेट संघाचा 23 वर्षीय सलामीवीर पृथ्वी शॉ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तो एका वादात अडकतानाही दिसला होता.
त्याचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री सपना गिल आणि तिच्या मित्रांबरोबर मोठा वाद झाला होता, ज्यामुळे सपना आणि तिच्या मित्रांना अटकही झाली होती. आता असे समजत आहे की सपनानेही शॉविरुद्ध पोलीस तक्रार केली आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईतील एका हॉटेल बाहेर शॉ आणि सपना गिल यांच्यातील वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, हा वाद सेल्फीवरून सुरू झाल्याचे समजले होते.
शॉ याने सपना आणि तिच्या मित्रांना सातत्याने सेल्फीसाठी त्रास दिल्याने सेल्फी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे सपना आणि तिच्या मित्रांनी हॉटलमधून डिनर पार्टीकरून परत चाललेल्या शॉ आणि त्याच्या मित्रांचा पाठलाग केला होता.
यावेळी त्यांनी शॉचा मित्र आशिष यादव याच्या कारवर बेसबॉल बॅटने हल्ला केला होता, असा आरोप सपना आणि तिच्या मित्रांवर करण्यात आला होता.
याप्रकरणात मुंबई पोलिसांनी सपनासह शोबित ठाकूर आणि तिच्या अन्य मित्रांना ताब्यात घेतले होते. पण या प्रकरणात सोमवारी कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
त्यानंतर सपना हिने देखील शॉ आणि त्याच्या मित्रांविरुद्ध मुंबई एअरपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. त्यामुळे भारतीय दंड विधानानुसार कलम 34, 120B, 146, 148, 149, 323, 324, 351,354 आणि 509 यानुसार शॉ आणि त्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विनयभंग करण्याचाही आरोप आहे.
दरम्यान, तिच्या तक्रारीनंतर अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. पण आता यामुळे शॉ समोरील अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे.
तसेच रिपोर्ट्सनुसार सपना हिने सांगितले आहे की 15 फेब्रुवारीला तिने एका क्लबमध्ये शॉ याला मद्यधुंद अवस्थेत पाहिले होते. त्याच्याकडे तिचा मित्र शोबित सेल्फी मागण्यासाठी गेला होता.
पण शॉ याने तिच्या मित्राचा फोन खाली फेकला. तसेच तिने सांगितले की ती स्वत: क्रिकेट फॅन नसून ती शॉ याला ओळखतही नव्हती. पण शोबितबरोबर त्यांची भांडण झाल्याने ती त्याला वाचवण्यासाठी मधे पडली होती.
तसेच असाही आरोप आहे की शॉ याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्याचबरोबर सपनाने असाही दावा केला आहे की ती शॉ आणि त्याच्या मित्रांविरुद्ध तक्रार करणार होती. पण त्यांनी तिला असे न करण्याबद्दल विनंती केली होती.
याचबरोबर शॉ आणि तिच्या मित्रांनी सपनाने 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. हा आरोपही सपनाने फेटाळला आहे.
दरम्यान या प्रकरणाती पूर्ण सत्य अद्याप समोर आलेले नाही. तसेच पृथ्वी शॉ यानेही याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.