Prithvi Shaw: मित्र असावा तर असा! गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरचा शॉला पाठिंबा, फोटो Viral

कार हल्ला प्रकरणात पृथ्वी शॉला त्याचा मित्र अर्जुन तेंडुलकरकडून पाठिंबा मिळाला आहे.
Arjun Tendulkar | Prithvi Shaw
Arjun Tendulkar | Prithvi ShawDainik Gomantak
Published on
Updated on

Prithvi Shaw: भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याच्या संदर्भातील एक वाद समोर आला आहे. पण आता त्याला त्याचा मित्र आणि गोव्याचा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरकडून पाठिंबा मिळाला आहे.

काही रिपोर्ट्सनुसार काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका फाईव्ह स्टार रेस्टॉरंटबाहेर शॉच्या कारवर काही लोकांकडून हल्ला झाला होता. तसेच हल्ला करणाऱ्या ग्रुपमध्ये सोशल मीडिया इन्फुएंसर सपना गिल आणि तिचा मित्र शोबित ठाकूर असल्याचे समजले आहे.

शॉ याने सेल्फीसाठी नकार दिल्याने त्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या घटनेतील काही व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात शॉ सपना गिलबरोबर झटापट करतानाही दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणात ८ जणांवर गुन्हा दाखल झाला असून सपना गिलला अटकही करण्यात आल्याचे समजले आहे.

Arjun Tendulkar | Prithvi Shaw
Prithvi Shaw च्या कारवर हल्ला करण्याचा आरोप असलेल्या सपना गिलला अटक, वाचा नक्की प्रकरण काय
Arjun Tendulkar post
Arjun Tendulkar postInstagram

आता याच प्रकरणात आता शॉ याला त्याचा लहानपणीपासूनचा मित्र अर्जुन तेंडुलकरकडून पाठिंबा मिळाला आहे. अर्जुनने शॉ याला पाठिंबा देताना इंस्टाग्राम स्टोरीवर दोघांचे एकत्र फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याने या फोटोंवर कॅप्शन लिहिले आहे की 'हिंमत हारू नकोस. तुझ्या चांगल्या आणि वाईट काळतही मी नेहमीच बरोबर असेल.'

अर्जुनने दिलेल्या या पाठिंब्यावर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत. अर्जुन हा भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. अर्जुन आणि शॉ यांनी मुंबईत एकत्र विविध वयोगटातील क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्रीही आहे.

Arjun Tendulkar | Prithvi Shaw
Prithvi Shaw नं केला देवाचा धावा, महिलेला मारहाणीच्या आरोपानंतर पोस्ट होतेय व्हायरल

दरम्यान, अर्जुनने मुंबईतील वरिष्ठ संघान अन्य प्रमुख खेळाडूंच्या उपस्थितीत पुरेशी संधी मिळत नसल्याने गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याने 2022-23 हंगामात गोव्याकडून प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी20 क्रिकेटमध्येही पदार्पण केले आहे.

त्याने गोव्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करण्याचाही पराक्रम केला होता. त्याने 120 धावांची खेळी केली होती. महत्त्वाचे म्हणजे सचिन तेंडुलकरनेही त्याच्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात शतक केले होते. अर्जुन हा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com