Santosh Trophy 2023: ट्रिजॉयचा गोल गोव्यासाठी लाखमोलाचा; केरळला नमवून गोवा मुख्य फेरीत दाखल

गुजरातने छत्तीसगडला 4-0 ने हरवले
संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अ गट साखळी फेरी जिंकलेला गोव्याचा संघ.
संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अ गट साखळी फेरी जिंकलेला गोव्याचा संघ.Dainik Gomantak
Published on
Updated on

Santosh Trophy 2023: हुकमी खेळाड़ू ट्रिजॉय डायस याने उत्तरार्धात नोंदविलेला गोल गोव्यासाठी मंगळवारी लाखमोलाची ठरला. त्या बळावर यजमानांनी बलाढ्य केरळला 1-0 असे निसटते हरवून 77व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.

बाणावली येथील मैदानावर झालेल्या निर्णायक अ गट सामन्यात ट्रिजॉयने 57व्या मिनिटास केलेला प्रेक्षणीय गोल सामन्याचे पारडे गोव्याच्या बाजूने फिरवणारा ठरला.

मंगळवारच्या लढतीपूर्वी केरळने सलग तीन सामने चांगल्या गोलफरकाने जिंकले होते, त्यामुळे आगेकूच राखण्यासाठी पाहुण्या संघाला बरोबरीचा एक गुण पुरेसा होता. गोव्याचे तीन लढतीनंतर सात गुण होते आणि केरळला मागे टाकण्यासाठी त्यांना विजय अत्यावश्यक होता.

संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अ गट साखळी फेरी जिंकलेला गोव्याचा संघ.
37th National Games साठी गोव्यात खेळाडू दाखल होण्यास सुरवात; दाबोळी विमानतळावर क्रीडा मंत्र्यांकडून स्वागत...

अनुभवी डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघासाठी हा एक प्रकारे अंतिम सामनाच होता आणि त्यांनी त्यात बाजी मारली.

गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस, नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या हस्ते गोव्याच्या संघाला अ गट साखळी विजेतेपदाचा करंडक देण्यात आला.

सलग दुसऱ्या वर्षी मुख्य फेरी

प्रत्येकी चार सामने खेळल्यानंतर तीन विजय व एका बरोबरीमुळे गोव्याचे 10 गुण झाले व त्यांना पाच संघांच्या अ गटात अव्वल क्रमांक मिळाला. तीन विजय व एका पराभवामुळे केरळचे नऊ गुण झाले. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

गोव्याने गतवर्षीची स्पर्धेची मुख्य फेरी गाठली होती, पण त्यांना सर्व लढती गमवाव्या लागल्या होत्या. संतोष करंडक राष्ट्रीय स्पर्धा गोव्याने पाच वेळ, तर केरळने सात वेळा जिंकली आहे.

संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अ गट साखळी फेरी जिंकलेला गोव्याचा संघ.
T-20 Cricket: गोव्याचा मणिपूरवर सहज विजय; लागोपाठ दुसरा सामना जिंकला

गुजरातचा विजय, तिसरा क्रमांक

गुजरातने बाणावली मैदानावर मंगळवारी सकाळच्या सत्रात छत्तीसगडला 4-0 असे लीलया हरविले. दोन विजय, प्रत्येकी एक बरोबरी व पराभव यामुळे त्यांचे सात गुण झाले. त्यांना तिसरा क्रमांक मिळाला. छत्तीसगडला सलग चौथा पराभव पत्करावा लागला.

गुजरातसाठी तुफेल हिंगारो याने दोन, तर धर्मेश परमार व चिन्खोसियाम डिम्गेल याने प्रत्येकी एक गोल नोंदविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com