Sania Mirza: 'तिचा अन् शोएबचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट...', सानियाच्या कुटुंबियांकडून अधिकृत खुलासा

Shoaib Malik marriage: शोएब मलिकने सना जावेदबरोबर लग्न केल्यानंतर सानिया आणि तिच्या कुटुंबियांकडून यावर अधिकृत भाष्य करण्यात आले आहे.
Shoaib Malik - Sana Javed | Sania Mirza
Shoaib Malik - Sana Javed | Sania MirzaInstagtam
Published on
Updated on

Sania Mirza Family and Team confirms her divorce with Shoaib Malik:

शनिवारी (20 जानेवारी) पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर लग्न करत सर्वांना धक्का दिला. त्याच्या लग्नानंतर त्याच्या आणि सानिया मिर्झाच्या नात्याबद्दल चर्चांना उधाण आले. यानंतर आता रविवारी (21 जानेवारी) सनिया आणि तिच्या कुटुंबियांकडून अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आले.

शोएब आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा यांचे 2010 मध्ये हैदराबादमध्ये लग्न झाले होते. त्यांना 2018 मध्ये इझहान हा मुलगाही झाला. मात्र, त्यांच्यात दुरावा आल्याच्या अनेक बातम्या गेल्या काही महिन्यात समोर आल्या होत्या. त्यातच आता शोएबने सनाबरोबर लग्न केल्यानंतर सानिया आणि त्याचे नाते तुटल्याचे स्पष्ट झाले होते.

मात्र, सानिया किंवा तिच्या जवळच्या लोकांकडून यावर अधिकृत भाष्य करण्यात आले नव्हते. अखेर रविवारी सनिया आणि तिचे कुटुंबिय व टीमकडून सोशल मीडियावर एक अधिकृत पोस्ट शेअर करण्यात आली, ज्यात तिचा आणि शोएबचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Shoaib Malik - Sana Javed | Sania Mirza
Sania Mirza: तब्बल 20 वर्षांच्या कारकिर्दिला अखेरचा अलविदा, MC Stan, युवीचीही कोर्टवर हजेरी; पाहा Video

त्यात लिहिले आहे की 'सानियाने नेहमीच तिचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवले आहे. तथापि आज तिने हे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे की शोएब आणि तिने काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट घेतला आहे. शोएबच्या नव्या प्रवासासाठी तिने शुभेच्छा दिल्या आहेत.'

'तिच्या आयुष्यातील या नाजूक काळात आम्ही सर्व चाहत्यांना आणि शुभचिंतकांना विनंती करतो की कोणत्याही अफवांमध्ये गुंतू नका आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करा.'

Shoaib Malik - Sana Javed | Sania Mirza
Shoaib Malik: सानियाबरोबर घटस्फोट? शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर बांधली लग्नगाठ, स्वत:च दिली माहिती

दरम्यान, सध्या सानिया ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेसाठी समालोचन करत आहे. तिने गेल्याचवर्षी आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तिने तिच्या कारकिर्दीत 6 ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले आहे.

शोएबबद्दल सांगायचे झाल्यास सना ही त्याची तिसरी पत्नी आहे. त्याने यापूर्वी आयेशा सिद्धकीबरोबर 2002 मध्ये लग्न केले होते. त्यांचे लग्न 2010 पर्यंत टिकले. त्यानंतर तिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर शोएबने 2010 मध्ये सानियाशी लग्न केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com