Brij Bhushan Sharan Singh : हा तर इमोशनल ड्रामा; ब्रिजभूषण सिंग यांचे कुस्तीपटूंबद्दल वादग्रस्त विधान

Wrestlers Protest : ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. यावर, गंगेत पदक विसर्जित केल्याने मला फाशी दिली जाणार नाही, हे भावनिक नाटक आहे, असे ब्रिजभूषण म्हणाले.
Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan SinghDainik Gomantak.
Published on
Updated on

भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. हे प्रकरण इतके वाढले आहे की कुस्तीपटूंनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शेतकरी नेते राकेश टिकेट यांच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटूंनी त्यांचा पदके विसर्जित करण्याचा निर्ण मागे घेतला.

माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास फाशी घेईन

माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वत:ला फाशी देईन, असे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका मेळाव्याला संबोधित करत होते.

Brij Bhushan Sharan Singh
Ayodhya: कर्नाटक, राजस्थानमधील दगडांनी तयार होत आहे रामललाची मूर्ती, जाणून घ्या कधी होणार प्रतिष्ठापना?

ब्रिजभूषण म्हणाले, 'मी म्हणालो होतो की, माझ्यावर एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वत:ला फाशी देईन. आजही मी त्याच मुद्द्यावर ठाम आहे. चार महिने झाले त्यांना मला फासावर लटकवायचे आहे, पण सरकार मला फाशी देत ​​नाही, म्हणून कुस्तीपटू आपली पदके गंगेत फेकणार आहेत.

माझ्यावर आरोप करणाऱ्यांना समजायला हवे की, गंगेत पदक टाकून ब्रिजभूषणला फाशी होणार नाही. भाजप खासदार पुढे म्हणाले की, तुमच्याकडे पुरावे असतील तर जा आणि पोलिस किंवा कोर्टात द्या, कोर्टाने मला फाशी दिली तर ती मी मान्य करतो. हे सर्व भावनिक नाटक आहे.

Brij Bhushan Sharan Singh
Keral HighCourt on Mobile Tower : मोबाइल फोनशिवाय आज कोणीही जगू शकणार नाही ; केरळ उच्च न्यायालयाची टिप्पणी

काय प्रकरण आहे?

मंगळवारी, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटू आपली ऑलिम्पिक आणि जागतिक पदके गंगा नदीत विसर्जित करण्यासाठी आले होते, परंतु शेतकरी नेत्यांच्या समजूतीने त्यांनी पदकांचे विसर्जन केले नाही. भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचे आरोप आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com