WTC 2023 Final मधील पराभवानंतर सचिन तेंडुलकरने उपटले टीम इंडियाचे कान, 'समजलेच नाही की...'

सचिन तेंडुलकरने WTC Final मध्ये भारतीय संघाकडून कोणती मोठी चूक झाली, याबद्दल सांगितले आहे.
Team India |Sachin Tendulkar
Team India |Sachin TendulkarDainik Gomantak

Sachin Tendulkar expressed disappointment over R Ashwin's exclusion: कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकावले. भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी म्हणजेच रविवारी (11 जून) ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

यापूर्वी कसोटी चॅम्पियनशीप 2019-21 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून कोणती मोठी चूक झाली, याबद्दल मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितले आहे. सचिनने ट्वीट करत ऑस्ट्रेलियाचे कौतुक केले. याबरोबरच आर अश्विनला भारतीय संघाने खेळवायला हवे होते असे म्हटले आहे.

Team India |Sachin Tendulkar
WTC 2023-25 Cycle: तिसऱ्या पर्वात भारतीय संघ 'या' सहा संघाविरुद्ध खेळणार कसोटी मालिका, वेळापत्रक जाहीर

भारतीय संघाने इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजीला पोषक वातारण लक्षात घेता प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज असे संमिश्रण खेळवले होते.

याबद्दल रविवारी अंतिम सामना संपल्यानंतर सचिनने ट्वीट केले की 'कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड यांच्या पहिल्याच दिवशीच्या भक्कम खेळीने सामना त्यांच्या बाजूने झुकवला होता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात दिर्घकाळ फलंदाजी करावी लागणार होती, पण त्यात ते अपयशी ठरले.

भारतीय संघासाठी काही चांगले क्षणही आले, पण मला हे समजले नाही की आर अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर का ठेवण्यात आले. तो सध्या कसोटीतील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे.'

Team India |Sachin Tendulkar
घरचे शेर, इंग्लंडमध्ये ढेर! WTC Final मध्ये टीम इंडियाचं कुठे चुकलं? वाचा पराभवाची 5 कारणं

सचिनने एका उत्तम फिरकीपटूला संघात संधी का द्यावी, यामागील कारणही ट्वीटमध्ये सांगितले आहे. त्याने लिहिले, 'मी यापूर्वीही सामना सुरू होण्यापूर्वी म्हटलो होते, कौशल्यपूर्ण फिरकीपटू नेहमीच खेळपट्टीवर अवंलबून राहात नाही, ते हवेच्या प्रवाहाचा आणि खेळपट्टीवर मिळणाऱ्या उसळीचा वापर करू शकतात. हे विसरून चालणार नाही की ऑस्ट्रेलिया संघात त्यांच्या पहिल्या 8 फलंदाजांपैकी 5 डावखुरे खेळाडू आहेत.'

आर अश्विन सध्या कसोटी क्रमावारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 92 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 474 विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटी सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा अनिल कुंबळेनंतरचा (619 विकेट्स) दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com