T20 Ranking: ऋतुराज, बिश्नोईची गरुडझेप! टॉप-10 खेळाडूंमध्ये मिळवले स्थान

ICC T20I Ranking: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई यांनी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
Ravi Bishnoi | Ruturaj Gaikwad
Ravi Bishnoi | Ruturaj Gaikwad BCCI
Published on
Updated on

ICC T20I Ranking, Ruturaj Gaikwad and Ravi Bishnoi:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच 3 डिसेंबर रोजी 5 सामन्यांची टी20 मालिका संपली. या मालिकेत भारताने 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना प्रभाव पाडला. यामध्ये भारताचा युवा सलामीवार ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई यांचाही समावेश आहे.

ऋतुराजने या मालिकेत पहिल्या तीन सामन्यात उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना आपल्या फलंदाजीने अनेकांना प्रभावित करणारी कामगिरी केली. त्यामुळे त्याने टी20 क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे. त्याने क्रमवारीत पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे.

ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 5 सामन्यांत 55.75 च्या सरासरीने आणि 1 शतकासह 223 धावा केल्या होत्या.

Ravi Bishnoi | Ruturaj Gaikwad
IND vs AUS: परंपरा कायम! पहिली टी20 मालिका जिंकताच कर्णधार सूर्यकुमारने कोणाकडे सोपवली ट्रॉफी, पाहा Video

ऋतुराजच्या या कामगिरीमुळे तो आता टी20 क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत 7 व्या क्रमांकावर आला आहे. त्याचे 673 रेटिंग पाँइंट्स आहेत. ही त्याची सर्वोत्तम क्रमवारी आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी 79 व्या क्रमांकावर होता.

टी२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 जणांमध्ये ऋतुराजव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव आहे. सूर्यकुमार 881 रेटिंग पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान (787 पाँइंट्स) आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या रवी बिश्नोईनेही पहिल्या 10 जणांमध्ये स्थान मिळवले आहे. तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातीच टी20 मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.

Ravi Bishnoi | Ruturaj Gaikwad
IND vs ENG: वानखेडेवर रंगणार भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्यांचा थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

त्याने 5 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो आता टी20 क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत 665 रेटिंग पाँइंट्ससह पाचव्या क्रमांकावर आला आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी 19 व्या क्रमांकावर होता. गोलंदाजांमध्ये पहिल्या 10 जणांत केवळ रवी बिश्नोई हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे.

त्याच्यानंतर अर्शदीप सिंग 18 व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर अफगाणिस्तानचा राशिद खान आहे. त्याने 692 रेटिंग पाँइंट्स आहेत. वनिंदू हसरंगा (679) दुसऱ्या, आदील राशिदही संयुक्तरित्या (679) दुसऱ्या क्रमांकावर आहे. महिश तिक्षणा (677) चौथ्या क्रमांकावर आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पंड्या दुसऱ्या क्रमांकावर काय आहे, तर शाकिब अल हसन अव्वल क्रमांकावर कायम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com