IND vs AUS: परंपरा कायम! पहिली टी20 मालिका जिंकताच कर्णधार सूर्यकुमारने कोणाकडे सोपवली ट्रॉफी, पाहा Video

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने भारताचा कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलीच कसोटी मालिका जिंकली आहे.
Suryakumar Yadav | India vs Australia
Suryakumar Yadav | India vs AustraliaPTI
Published on
Updated on

India Captain Suryakumar Yadav hands over trophy to Rinku Singh, Jitesh Sharma after won T20I Series against Australia:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच 5 सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेतील पाचवा सामना बंगळुरूला रविवारी (3 डिसेंबर) पार पडला. या सामन्यात भारताने 6 धावांनी विजय मिळवला. यासह भारताने मालिकेतही 4-1 अशा फरकाने भारताने विजय मिळवला.

या मालिकेत भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादवने केले होते. त्याने या मालिकेत पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व केले होते आणि पहिल्याच मालिकेत कर्णधार म्हणून विजय देखील मिळवला.

दरम्यान, मालिका जिंकल्यानंतर विजयाची ट्रॉफी पाहुण्यांकडून सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली. त्यानंतर सूर्यकुमारनेही मोठे मन दाखवत संघातील युवा खेळाडू रिंकू सिंग आणि जितेश शर्माकडे विजेतेपदाची ट्रॉफी सोपवली आणि तो बाजूला झाला.

Suryakumar Yadav | India vs Australia
IND vs AUS: रवी बिश्नोईच्या फिरकीची जादू! 9 विकेट्ससह आर अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी

खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटमध्ये अशी परंपरा पाहायला मिळाली आहे, ज्यावेळी मालिका जिंकल्यानंतर किंवा स्पर्धा जिंकल्यानंतर त्या विजेतेपदाची ट्रॉफी कर्णधार संघातील एखाद्या युवा खेळाडूकडे सोपवली जाते. त्यामुळे संघातील युवा खेळाडू ती ट्रॉफी उंचावताना दिसतो. हीच परंपरा सूर्यकुमारने पुढे चालू ठेवल्याने सर्वांनी त्याचे कौतुक केले आहे.

भारताचा विजय

रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 160 धावा उभारल्या.

भारताकडून उपकर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. तसेच अक्षर पटेलने 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेऱ्हेनडॉर्फ आणि बेन ड्वारशुई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Suryakumar Yadav | India vs Australia
Hockey Junior World Cup: पहिल्याच सामन्यात डझनभर गोल करणाऱ्या भारतीय महिलांचं आव्हान सलग दोन पराभवानंतर संपलं

त्यानंतर 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटने 54 धावांची खेळी केली. तसेच ट्रेविस हेडने 28 धावांची आणि वेडने 22 धावांची खेळी केली. बाकी कोणाला खास काही करता आले नाही. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

भारताचा मालिकेत विजय

भारतीय क्रिकेट संघाने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने आपले आव्हान कायम राखले. मात्र, पुन्हा भारतीय संघाने चौथ्या सामन्यात विजय मिळवत मालिकाही खिशात घातली. यानंतर अखेरचा सामनाही भारताने जिंकला आणि मालिकाही 4-1 अशा फरकाने जिंकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com