रूपालीने घेतली हरियानाची ‘फिरकी’

गोव्याचा सलग दुसरा विजय, प्रतिस्पर्ध्यांनी 15 धावांत गमावल्या 8 विकेट
Goa Womens Cricketer Rupali Chavan
Goa Womens Cricketer Rupali ChavanDainik Gomantak
Published on
Updated on

c: रूपाली चव्हाण (Goa Spinner Rupali Chavan) हिच्या भेदक फिरकीसमोर हरियानाच्या (Haryana) महिला क्रिकेट संघाने नांगी टाकताना 15 धावांत 8 विकेट गमावल्या, त्यामुळे सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ड गटात गोव्याने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली (Goa Won). शिखा पांडे (Captain Shikha Pandey) हिच्या नेतृत्वाखालील संघाने सामना 71 धावांनी जिंकला.

विझियानगरम येथील डॉ. पी. व्ही. जी. राजू एसीए क्रीडा संकुल मैदानावर सोमवारी सामना झाला. गोव्याने (Goa Women's Cricket) काल विदर्भला (Vidarbh) 7 विकेट राखून हरविले होते.

Goa Womens Cricketer Rupali Chavan
बुमराह ने दिले T-20 World Cup मध्ये होणाऱ्या पराभवांचे मुख्य कारण

गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 7 बाद 202 धावा केल्या, नंतर हरियानाने लक्ष्याच्या दिशेने दमदार वाटचाल केली होती. त्यांची स्थिती 2 बाद 116 अशी चांगली होती, पण नंतर त्यांचा डाव 40.2 षटकांत 131धावांत संपुष्टात आला.

गोव्याची आणखी एक फिरकी गोलंदाज सुनंदा येत्रेकर हिने वर्षा भाटीवाल हिला बाद केल्यानंतर रूपालीने हरियानाचा डाव कापून काढला. तिने 4 विकेट टिपल्या, त्यामुळे 8.3 षटकांत हरियानाने 15 धावांत 8 विकेट गमावल्या आणि गोव्याला सोपा विजय मिळाला. त्यापूर्वी रीमा सिसोदिया (33) व शीतल राणा (53) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली होती. शिखाने रीमा हिला धावबाद केल्यानंतर गोव्याने सामन्याची सूत्रे हाती घेतली. हरियानाच्या तीन खेळाडू धावबाद झाल्या. सुनंदाने दोघींनी बाद केले.

Goa Womens Cricketer Rupali Chavan
T20 World Cup 2021: टीम इंडिया उपांत्य फेरीत कशी पोहोचणार? जाणून घ्या

गोव्याची दमदार फलंदाजी

गोव्याने दमदार फलंदाजी करतान द्विशतकी टप्पा ओलांडला. फलंदाजीत गोव्याच्या प्रमुख खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले. पूर्वजा वेर्लेकर (21) व श्रेया परब (24) यांनी गोव्याला 49 धावांची सलामी दिली. सलामीच्या दोघीही एका धावेत बाद झाल्यानंतर, काल विदर्भाविरुद्ध अर्धशतक केलेली तेजस्विनी दुर्गड (41) व कर्णधार शिखा (40) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करून गोव्याला भक्कम स्थिती गाठून दिली. डावाच्या अखेरच्या टप्प्यात सुनंदा येत्रेकर (नाबाद 35) व विनवी गुरव (26) यांची 50 धावांची भागीदारी निर्णायक ठरली, त्यामुळे गोव्याने धावफलकावर द्विशतक लावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com