T20 World Cup 2021: टीम इंडिया उपांत्य फेरीत कशी पोहोचणार? जाणून घ्या

न्यूझीलंडकडून (New Zealand) 8 विकेटने पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

न्यूझीलंडकडून (New Zealand) 8 विकेटने पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला (Indian Team) उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे. भारताला आता अफगाणिस्तान (Afghanistan), स्कॉटलंड (Scotland) आणि नामिबियाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ तिन्ही संघांतून विजय मिळवण्यात यशस्वी ठरला, तर भारताचे 6 गुण होतील, तर दुसरीकडे न्यूझीलंडने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्धच्या (Namibia) विजयानंतर आगामी सामन्यांमध्ये विजय मिळवल्यास त्यांचे 8 गुण होतील. भारत उपांत्य फेरीत पोहोचेल. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंडने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाला पराभूत केल्यावर हे समीकरण तयार होईल. परंतु अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाच्या संघांमध्ये काहीसा फरक जरी पडला तरी न्यूझीलंडच्या संघाला एक फायदा आहे. कारण त्यांनी भारताला हरवून 2 गुणांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवल्यास आणि नामिबिया आणि स्कॉटलंडवर विजय मिळवल्यास त्याचे 6 गुण होतील आणि ते धावगतीच्या आधारावर भारतापेक्षा पुढे असतील.

Virat Kohli
T20 World Cup 2021: 'ही' आहेत टीम इंडियाच्या पराभवाची कारणे

दरम्यान, भारताला सर्व सामने जिंकावे लागतील आणि इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला आता उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे. कारण भारतासमोर अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचे आव्हान असणार आहे. भारताने येत्या तीन सामन्यात विजय मिळवला तरीही त्याचे 6 गुण होतील असे गृहीत धरु, परंतु 2 सामन्यांमध्ये खराब पराभवामुळे धावगती कमी असेल तर ज्यामुळे इतर संघांना फायदा होईल. धावगतीच्या आधारावर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा संघ भारतापेक्षा पुढे राहू शकतो. अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाच्या संघांना मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. आणि रनरेट कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला आता तिन्ही संघांना मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल, तरच रनरेटमधील फरक कमी होईल. परंतु आता भारताला येत्या तीन सामन्यांमध्ये मोठा विजय मिळवावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com