रोहित की हार्दिक, T20I World Cup 2024 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार? जय शाह यांनीच दिलं उत्तर

Team India Captain in T20I World Cup 2024: टी20 वर्ल्डकपमध्ये 2024 स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोणाच्या हातात असणार आहे, यावर जय शाह यांनी शिक्कामोर्तब झाले आहे.
Rohit Sharma - Hardik Pandya
Rohit Sharma - Hardik PandyaX/ICC
Published on
Updated on

Jay Shah, BCCI secretary confirmed captain of Team India for T20 Cricket World Cup 2024:

यंदा जून 2024 मध्ये आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केलेल्या विधानानंतर या प्रश्नाच्या उत्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माच आगामी टी20 वर्ल्डकपमध्येही भारताचे नेतृत्व करेल, हे जय शाह यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच कॅरेबियन बेटं आणि अमिरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये भारतीय संघ विजेतेपद मिळवेल, अशी आशाही शाह यांनी व्यक्त केली.

Rohit Sharma - Hardik Pandya
IND vs ENG: राजकोटमध्ये रंगणार तिसरा कसोटी सामना; जाणून घ्या कसा आहे भारताचा या मैदानावरील रेकॉर्ड

राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना जय शाह म्हणाले, 'जरी आपण 2023 वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना गमावला असला, तरी सलग १० सामने जिंकून आपण मनं जिंकली आहेत.'

'मला खात्री आहे की भारत 2014 टी20 वर्ल्डकप रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बार्बाडोसमध्ये जिंकू.'

जय शाह यांच्या या वक्तव्यानंतर रोहित शर्माच आगामी टी20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा कर्णधार असेल, यावर शिक्कामोर्तब झाले आह.

खंरतर ऑस्ट्रेलियामध्ये 2022 साली झालेल्या टी20 वर्ल्डकपनंतर रोहित जवळपास 14 महिने भारताच्या टी२० संघात नव्हता. पण त्याला 14 महिन्यांनंतर जानेवारी 2024 मध्ये झालेल्या अफगाणिस्ताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले, इतकेच नाही तर त्याने या मालिकेत नेतृत्वही केले.

Rohit Sharma - Hardik Pandya
IND vs ENG: सर्फराज अन् जुरेलचे झाले पदार्पण, तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात चार बदल; पाहा प्लेइंग-11

दरम्यान, मधल्या काळात रोहित टी20 संघात नसताना त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याने भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळली होती.

त्यामुळे तो आगामी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतही भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असेही म्हटले जात होते. परंतु आता जय शाह यांनी कर्णधारपदासाठी रोहितच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

हार्दिक सध्या घोट्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान पार पडलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळताना ही दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोणताही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com