Rohit Sharma IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना धरमशालामध्ये होणार आहे. टीम इंडियाने मालिकेत आधीच 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
टीम इंडियासाठी गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. चौथ्या कसोटी सामन्यात भारताकडून यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी दमदार खेळी केली. युवा ब्रिगेडने टीम इंडियाला स्वबळावर विजय मिळवून दिला होता. धरमशाला येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा दोन मोठे विक्रम करु शकतो.
दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार आणि सुपरस्टार फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 594 षटकार ठोकले आहेत. धरमशाला येथे होणाऱ्या कसोटी सामन्यात त्याने आणखी 6 षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 600 षटकार पूर्ण करेल. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरणार आहे. युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार मारले आहेत.
रोहित शर्मा - 594 षटकार
ख्रिस गेल- 553 षटकार
शाहिद आफ्रिदी- 476 षटकार
ब्रेंडन मॅक्युलम- 398 षटकार
मार्टिन गप्टिल- 383 षटकार
दुसरीकडे, रोहित शर्मा नेहमीच विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने आणखी एक षटकार मारल्यास तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील 50 षटकार पूर्ण करेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 50 षटकार मारणारा तो बेन स्टोक्सनंतरचा दुसरा फलंदाज ठरेल.
बेन स्टोक्स- 78 षटकार
रोहित शर्मा- 49 षटकार
ऋषभ पंत- 38 षटकार
जॉनी बेअरस्टो- 27 षटकार
यशस्वी जयस्वाल- 26 षटकार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.