

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज रोहित शर्मा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांची धुलाई करणारा 'हिटमॅन' यावेळी त्याच्या एका मजेशीर वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. रोहित शर्माच्या 'फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा' या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय क्रिकेटमधील कर्णधारांचे लग्न आणि विश्वचषक विजय यांच्यातील संबंधावर गंमतीशीर चर्चा रंगताना दिसत आहे.
या शोमध्ये भारतीय संघाचा युवा फलंदाज आणि कर्णधार शुभमन गिलच्या लग्नाचा विषय निघतो. ज्या भारतीय कर्णधारांचे लग्न झाले आहे, त्यांनी विश्वचषक जिंकला आहे, अशा आशयाची चर्चा यावेळी केली जाते. त्यामुळे शुभमन गिलनेही लग्न करावे, असा मजेशीर सल्ला दिला जातो. मात्र, गिल इतक्यात लग्न करणार नसल्याचेही यावेळी बोलले जाते. या चर्चेमुळे शोमधील वातावरण अधिकच रंगतदार झाले.
शुभमन गिलच्या लग्नाचा विषय सुरू असतानाच रोहित शर्माने केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विश्वचषक जिंकण्यासाठी आपल्याला काहीही करावे लागले तरी आपण तयार असल्याचे रोहितने मजेशीर अंदाजात सांगितले. त्याच्या या प्रतिक्रियेमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
रोहितच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विश्वचषक जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी असल्याचं रोहित म्हणाल्याने काही चाहत्यांनी तो दुसरं लग्न करणार का, असा मजेशीर अंदाज व्यक्त केला. मात्र, रोहितच्या वक्तव्याचा हा केवळ विनोदी संदर्भ आहे. त्यामुळे चाहत्यांच्या या प्रतिक्रिया केवळ गमतीशीर चर्चेचाच भाग आहेत. सध्या या शोमधील रोहितचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याच्या वक्तव्याची क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.