India vs Australia: टॉससाठी मैदानात उतरताच कॅप्टन रोहितचा रेकॉर्ड! द्रविड-धोनीला मागे टाकत बनला 'अव्वल'

Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पहिलाच सामना खेळताना रोहित शर्माच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.
Pat Cummins - Rohit Sharma
Pat Cummins - Rohit SharmaBCCI
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia, Rohit Sharma:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सामना होत आहे. चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या सामन्याआधी जेव्हा रोहित शर्मा भारताचा कर्णधार म्हणून नाणेफेकीसाठी उतरला, त्याचवेळी त्याच्या नाववर एक विक्रम नोंदवला गेला. रोहितचा हा कारकिर्दीतील तिसरा वनडे वर्ल्डकप असला, तरी कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच वर्ल्डकप आहे.

त्यामुळे तो भारताचा वर्ल्डकपमध्ये नेतृत्व करणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो जेव्हा नाणेफेकीसाठी उतरला, तेव्हा त्याचे वय 36 वर्षे 161 दिवस इतके होते. त्याने याबाबत मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले आहे.

Pat Cummins - Rohit Sharma
World Cup 2023: फोर-सिक्सची बरसात अन् 49 चेंडूत शतक! मार्करमने मोडला 2011 वर्ल्डकपमधील विश्वविक्रम

अझरुद्दीनने 1999 च्या वर्ल्डकपमध्ये जेव्हा भारताचे अखेरच्या वेळी नेतृत्व केले होते, तेव्हा त्याचे वय 36 वर्षे 124 दिवस इतके होते. त्याखालोखाल राहुल द्रविडचे नाव आहे. त्याने 2007 वर्ल्डकपमध्ये भारताच्या शेवटच्या सामन्यात नेतृत्व केले, तेव्हा त्याचे वय 34 वर्षे 71 दिवस होते.

वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करणारे सर्वात वयस्कर कर्णधार

  • 36 वर्षे 161 दिवस - रोहित शर्मा (2023 वर्ल्डकप)

  • 36 वर्षे 124 दिवस - मोहम्मद अझरुद्दीन (1999 वर्ल्डकप)

  • 34 वर्षे 71 दिवस - राहुल द्रविड (2007 वर्ल्डकप)

  • 36 वर्षे 56 दिवस - श्रीनिवास वेंकटराघवन (1979 वर्ल्डकप)

  • 33 वर्षे 262 दिवस - एमएस धोनी (2015 वर्ल्डकप)

गिलच्या ऐवजी इशान

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल अनुपलब्ध होता. त्याला काही दिवसांपूर्वीच डेंग्यू झाल्याचे निष्पण्ण झाले होते. त्यामुळे तो त्यातून अद्याप पूर्ण बरा झालेला नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी इशान किशनला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

तसेच गिलशिवाय मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.

Pat Cummins - Rohit Sharma
सचिन तेंडुलकर म्हणतोय, भारताबाबत शंकाच नाही, पण 'हे' तीन संघही World Cup 2023 साठी प्रबळ दावेदार

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  • ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, ऍडम झम्पा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com