Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

BCCI Advised Ban on Chit Celebration IPL 2026: आयपीएल २०२६ (IPL 2026) चा हंगाम जसा मैदानातील अटीतटीच्या सामन्यांमुळे गाजत आहे, तसाच तो खेळाडूंच्या वेगवेगळ्या आणि अजब सेलिब्रेशनच्या पद्धतींमुळेही कमालीचा चर्चेत आला आहे.
BCCI Advised Ban on Chit Celebration IPL 2026
BCCI Advised Ban on Chit Celebration IPL 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

आयपीएल २०२६ (IPL 2026) चा हंगाम जसा मैदानातील अटीतटीच्या सामन्यांमुळे गाजत आहे, तसाच तो खेळाडूंच्या वेगवेगळ्या आणि अजब सेलिब्रेशनच्या पद्धतींमुळेही कमालीचा चर्चेत आला आहे. चालू हंगामात सध्या अनेक खेळाडूंचे 'पर्ची सेलिब्रेशन' (चिट काढून आनंद साजरा करणे) प्रचंड गाजत आहे. विकेट घेतल्यानंतर किंवा मोठी कामगिरी केल्यानंतर खिशातून एक कागदाची चिठ्ठी काढायची आणि त्यावर लिहिलेला संदेश कॅमेऱ्यासमोर दाखवायचा, अशी ही नवीन पद्धत आहे. मात्र, आता या सेलिब्रेशनवरून क्रिकेट विश्वात एक नवीन वाद निर्माण झाला असून, भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू अंबाती रायडू याने यावर थेट बंदी घालण्याची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) केली आहे.

आकाश सिंगच्या 'पर्ची सेलिब्रेशन'नंतर वादाला तोंड

१५ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान हा वाद पेटला. लखनऊचा वेगवान गोलंदाज आकाश सिंग याने या सामन्यात चेन्नईच्या तीन मुख्य फलंदाजांना बाद करत उत्कृष्ट गोलंदाजी केली.

त्याने संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि उरवील पटेल या बड्या खेळाडूंचे विकेट घेतले. प्रत्येक विकेट घेतल्यानंतर आकाशने आपल्या खिशातून एक चिठ्ठी बाहेर काढली आणि ती दाखवत अनोख्या पद्धतीने जल्लोष केला. आकाशचे हे वागणे अनेक माजी क्रिकेटपटूंना अजिबात रुचलेले नाही.

BCCI Advised Ban on Chit Celebration IPL 2026
Goa Beach: गर्दीपासून दूर आणि बागा-कळंगुटच्या अगदी जवळ; गोव्यात फिरायला जाताना 'हा' सुंदर बीच कधीही चुकवू नका!

अंबाती रायडू भडकला

'ईएसपीएन क्रिकइन्फो' (ESPNCricinfo) च्या एका विशेष शोमध्ये बोलताना अंबाती रायडू आणि डेल स्टेन या दिग्गज क्रिकेटपटूंनी आकाश सिंगच्या या कृत्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

BCCI Advised Ban on Chit Celebration IPL 2026
Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

रायडूची प्रतिक्रिया: "अशा प्रकारे चिठ्ठी काढून सेलिब्रेशन करणे अत्यंत पोरकट वाटते. मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की, ही कल्पना खूप छान आहे असे त्याला कसे काय वाटले? टीव्हीवर हे करून आपण किती 'कूल' आहोत, असे त्याला दाखवायचे आहे का? मला त्याच्या अशा मित्रांनाही भेटायचे आहे ज्यांनी त्याला हा फालतू सल्ला दिला." रायडू पुढे म्हणाला की, अशा गोष्टींचा क्रिकेटमध्ये काहीही अर्थ उरत नाही. बीसीसीआयने अशा 'चिट सेलिब्रेशन'वर तात्काळ आणि अधिकृतपणे बंदी घातली पाहिजे, खेळाडूंना मैदानावर अशा चिठ्ठ्या आणण्याची कोणतीही गरज नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com