IND vs SL: टीम इंडियाला मोठा झटका; 'हा' खेळाडू मालिकेतून आउट

श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
Rituraj Gaikwad
Rituraj GaikwadDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. क्रिकेटर ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून या संदर्भातील माहिती दिली आहे. त्याच्या जागी बॅकअप म्हणून मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सांगितले आहे की, ऋतुराजच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली आहे आणि त्यामुळेच तो या मालिकेत खेळू शकणार नाही. (Rituraj Gaikwad out due to injury before the second T20 match)

Rituraj Gaikwad
VIDEO: रॉबर्ट ओडोनेलचा सुपरमॅन कॅच पाहिलात का?

लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात या फलंदाजाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये निर्णय घेण्यात आला होता, यावेळी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) माहिती दिली होती पण मनगटाच्या दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही आणि आता तो मालिकेतून बाहेर पडला.

Rituraj Gaikwad
चुरशीच्या लढतीत जमशेदपूरची नॉर्थईस्ट युनायटेडवर 3-2 मात

बीसीसीआयने (BBCI) आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, “श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बल्लेबाज ऋतुराज गायकवाडला वगळण्यात आले आहे. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याला उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली होती. यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली. ऋतुराज आता बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीवर इलाज करणार आहे. निवड समितीने मयंक अग्रवालचा उर्वरित दोन टी-20 सामन्यांसाठी संघात समावेश केला आहे.

ऋतुराजने अद्याप टीम इंडियासाठी वनडेमध्ये पदार्पण केलेले नाही. जरी त्याने भारतासाठी 3 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने भारतासाठी शेवटचा टी-20 सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहितने ऋतुराजला संधी दिली होती. या सामन्यात तो चार धावा करून आऊट झाला. ऋतुराजने गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यावेळी शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावरती गेला कारण भारताच्या प्रमुख खेळाडूंनी सजलेला संघ इंग्लंडच्या दौऱ्यावरती होता. ऋतुराजने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये 39 धावा केल्या आहेत.

Rituraj Gaikwad
चुरशीच्या लढतीत जमशेदपूरची नॉर्थईस्ट युनायटेडवर 3-2 मात

भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव केला आहे. तर शनिवारी दोन्ही संघ दुसरा सामना खेळणार आहेत. धर्मशाला येथील सुंदर हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरती हा सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका खिशात घालायला आवडेल तर श्रीलंका हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल आणि असे झाल्यास या मैदानावर होणारा तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com